शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी संघटनात्मक कार्याची गरज :आमदार जयंत आसगावकर
सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघाचे चर्चासत्र उत्साहात संपन्न.
सांगली - प्रतिनिधी.
सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघाचे वार्षिक चर्चासत्र सहविचार सभा,शांतीनिकेतन परिसर सांगली येथे दिनांक 15 जुलै 2026 रोजी संपन्न झाली .
उद्घाटना नंतर मुख्याध्यापक संघाचे सचिव, संतोष नाईक सर यांनी प्रास्ताविकामधून चर्चासत्राची आवश्यकता व संघटनांचे महत्त्व सांगितले . या समारंभासाठी पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार जयंत आसगावकर,माजी शिक्षक आमदार भगवान आप्पा साळुंखे, माध्यमिक शिक्षण विभागाचे प्र.शिक्षणाधिकारी विशाल दशवंत, महाराष्टू राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव,नंदकुमार सागर सर (पुणे), जिल्हा परिषद सदस्य कविता पाटील, उपशिक्षणाधिकारी गणेश भांबुरे,गीता शेंडगे, वेतन पथक अधीक्षक आबासाहेब लावंड व मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष अमृत पांढरे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संभाजी पाटील मार्गदर्शक बाळासाहेब जाधव, एम एस पाटील,राजेंद्र नागरगोजे व जिल्हा मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते .
उद्घाटनाच्या भाषणामध्ये माननीय आमदार जयंत आसगावकर यांनी, शासनाच्या शिक्षण विरोधी अनेक निर्णयामुळे,शिक्षण क्षेत्रावर भविष्यात संकटे गडद होणार असल्याचे सांगून,अशैक्षणिक कामामुळे शिक्षक जास्त वेळ शाळेच्या बाहेर असून एस आय आर व बी एल ओ सारख्या अशैक्षणिक कामामुळे,शिक्षणाचा मूळ हेतूच दूर ठेवण्यात येत आहे . यावर विधिमंडळात आवाज उठवून आम्ही शासनास जाब विचारला असून संघटनांनी याबाबत ही आक्रमक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली .
माजी आमदार भगवान आप्पा साळुंखे यांनी शिक्षण वाचवण्यासाठी जनसामान्यातून लढा उभारण्याची अपेक्षा व्यक्त केली . माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रभारी शिक्षण अधिकारी दशवंत साहेब यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी संघटना व प्रशासनाने एकत्र काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली . वेतन पथक कार्यालयाचे अधीक्षक लावून साहेब यांनी वेतन पथक कार्यालय कडील कामांची माहिती देऊन शालार्थ प्रणाली मधील दुरुस्त्या करून घेऊन उत्तम सेवा देणे बाबत आश्वासित केले .
दुपारच्या सत्रात, जीवन संस्कार शिक्षण अंतर्गत, प्रसिद्ध धनवंतरी डॉ.दिलीप पटवर्धन यांनी उपस्थित मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले . सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष,प्राचार्य आर एस चोपडे व माजी अध्यक्ष अमृत पांढरे यांनी मुख्याध्यापक संघटनेच्या च्या कामकाजाबद्दल गौरव उद्गार काढून पुढील संघटनात्मक कामासाठी शुभेच्छा दिल्या .
सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजयकुमार झांबरे यांनी,वर्षभरातील संघटनेच्या माध्यमातून, संघाने जिल्हा, विभाग व राज्यस्तरावरील केलेल्या कामाचा आढावा घेतला .संघटनेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्याध्यापक संघ सदैव तत्पर असल्याचे आश्वासित केले .
महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव राष्ट्रपती पदक विजेते प्राचार्य नंदकुमार सागर यांनी महामंडळाच्या वतीने शासन स्तरावर विविध प्रश्नांची सोडवणूक केले बाबतचे माहिती दिली . यावेळी संत सोपान काका फाउंडेशन,सासवड (पुणे )यांचे मार्फत जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय,सुंदर माझी शाळा अभियानातील पुरस्कार प्राप्त शाळांना प्रशस्तीपत्र,सन्मानचिन्ह व धनादेश यांचे वाटप करण्यात आले . सभेसाठी जिल्ह्यातून जवळजवळ 487 मुख्याध्यापकांनी उपस्थिती दर्शवली . सभेचे शेवटी मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष अरविंद कदम यांनी आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक संघाचे कोषाध्यक्ष विवेक कुंडले यांनी केले .


Post a Comment
0 Comments