Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

अंकुश शेलार यांना सोलापूर विद्यापीठातून हिंदी साहित्यामधील पी.एच.डी पदवी प्राप्त.

 अंकुश शेलार यांना  सोलापूर विद्यापीठातून हिंदी साहित्यामधील पी.एच.डी पदवी प्राप्त. 

सातारा - प्रतिनिधी.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ मधून "हरीश नवल का व्यंग्य साहित्य: एक अनुशीलन" या विषयांमध्ये त्यांना डॉक्टरेट ही पदवी  प्राप्त झालेले आहे. डॉक्टर प्रशांत रामचंद्र नलवडे मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर,जिल्हा सोलापूर या संशोधन केंद्रा मधून हिंदी साहित्यामधील शिक्षण क्षेत्रातील उच्च अशी पीएचडी पदवी प्राप्त झालेली आहे. हा शैक्षणिक खडतर प्रवास श्री.अंकुश जयवंत शेलार, यांनी रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस शाखा नंबर २, मध्ये राहून महाराजा सयाजीराव विद्यालय,व छत्रपती शिवाजी महाविद्यालय सातारा येथे पदवीचे तर पुढे पदव्युत्तर शिक्षण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून पूर्ण केले. यूजीसी ची नेट परीक्षा 2012 मध्ये व 2021 मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सेट परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. शिक्षण घेत असताना विविध विद्यालय-महाविद्यालयामध्ये केलेल्या सर्वांगीण सेवेचा विचार करून रयत शिक्षण संस्थेने 2005 मध्ये त्यांची शिपाई पदी नियुक्ती केली. सध्या ते रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा, येथे प्रयोगशाळा परिचर या पदावर कार्यरत आहेत. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील आणि सौ. लक्ष्मी भाऊराव पाटील (वहिनीसाहेब) यांना प्रमाण मानून आपला शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख परिपूर्ण केलेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. श्री. चंद्रकांत दळवी, रयत शिक्षण संस्थेचे संघटक मा. डॉ.अनिल पाटील, डॉ.भारती पाटील, सचिव मा. विकास देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू मा. ज्ञानदेव म्हस्के, कुलसचिव मा.डॉ.विजय कुंभार, सहसचिव मा.डॉ.शिवलिंग मेनकुदळे, डॉ.राजेंद्र मोरे, मा.श्री.बी. एन.पवार, डॉ.एस.टी साळुंखे, प्राचार्य, यशवंतराव चव्हाण सातारा. उपप्राचार्य. डॉ.जयकुमार चव्हाण, डॉ. डी. डी. नामदास कार्यलय अधीक्षक श्री. केशव औटी या मान्यवरांसह ग्रामस्थ डिस्कळ ता.खटाव जि. सातारा, ग्रामस्थ मळदपाटस ता. दौंड जि. पुणे यांनी त्यांना या यशाबद्दल अभिनंदननीय शुभेच्छा दिल्या. या यशाबद्दल सांगताना श्री.अंकुश शेलार यांनी आई वडील, पत्नी सौ.सुनीता, चि.साई, मुलगी श्रद्धा, नातेवाईकासह मित्रपरिवार यांच्या सहकार्यामुळे हे शैक्षणिक यश मिळविलेले आहे असे नम्रपणे नमुद केले आहे.


Post a Comment

0 Comments