माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त समाज विकास विद्यालयात विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप.
शिराळा - प्रतिनिधी.
सागाव,ता.शिराळा तालुक्याचे माजी आमदार श्री. मानसिंगराव फत्तेसिंगराव नाईक (भाऊ) यांच्या जन्मदिनानिमित्त समाज विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सागाव येथे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास विश्वास सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. बाबासो केशव पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्री. (तात्यासाहेब) वसंत गणपत पाटील, श्री. सुशांत पाटील, श्री. जयसिंग पाटील, सौ. शोभाताई पाटील, सौ. माधवीताई पाटील, श्री. रणजित लोहार, श्री. शिवाजी पाटील तसेच परिसरातील अन्य प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले.विद्यालयाने 'संत सोपानकाका सुंदर माझी शाळा' अभियानात तालुकास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. आर. पी.पाटील सर यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करून गौरव करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी विद्यालयाच्या उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमास पर्यवेक्षक श्री. डी. ए. गायकवाड सर , सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.




Post a Comment
0 Comments