चिंचोली येथे छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात संपन्न.
शिराळा - प्रतिनिधी.
चिंचोली (ता. शिराळा )येथे छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात संपन्न झाली .छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त जि. प. शाळा व ग्रामपंचायत चिंचोली यांच्या वतीने विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.त्याचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते आयु. रणधीर कांबळेसर बौद्ध समन्वय समिती शिराळा हे होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.प्रकाश जाधव हे होते. स्पर्धेचे बक्षीस वितरण सरपंच सौ. कविता पाटील व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.सचिन जाधव, श्री.कुंभार यांच्या हस्ते झाले. स्वागत मुख्याध्यापक मा.तानाजी माळी यांनी केले.यावेळी डॉ. पुजा सातपुते प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोली यांनी आरोग्य विषय माहिती दिली. स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस डॉ.बबन घोलप यांच्या स्मरणार्थ डॉ. सिंधू घोलप,डॉ.रोहण घोलप यांनी दिले.द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षिस जि.प. शिक्षक स्टाफ यांनी दिले. कार्यक्रमाचे आभार तानाजी खोत यांनी मानले.


Post a Comment
0 Comments