Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

बी.आर. एस.पी. च्या वतीने गुणगौरव सोहळा संपन्न.

 बी.आर. एस.पी. च्या वतीने गुणगौरव सोहळा संपन्न.

लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त बी.आर.एस.पी. आयोजित गुणवंत विद्यार्थी तसेच विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या संस्थांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न.

मुंबई : प्रतिनिधी.

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी (BRSP) च्या वतीने आयोजित 10वी व 12वी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला,या कार्यक्रमास डॉ. रसिक वारभुवन, युवा उद्योजक मा. गणेश रायकांटी, डॉ. पंकज चाळके, प्रबुद्ध परिवारचे अध्यक्ष वैभव सोनवणे, बाळासाहेब आढांगळे, राजाराम आढाव, नीलेश गायकवाड, सतेश मस्के, बाळकृष्ण तांबे, लहू कदम, धनराज शिराळ, वत्सला हिरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, सामाजिक बांधिलकी तसेच लोकराजा राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर मोलाचे मार्गदर्शन केले,यावेळी 10वी व 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले,कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व समाजबांधव उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा उपक्रमांची गरज असून, शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचा संदेश यावेळी देण्यात आला,कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन मुंबई प्रदेश अध्यक्ष दिपक मंगेश चौगुले यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बी.आर.एस.पी.चे नेते धनंजय तुपलोंढे, वॉर्ड अध्यक्ष प्रशांत आढाव, नकुल शार्दुल, संतोष मस्के, मानव गायकवाड तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, विद्यार्थी, पालक, समाजबांधव आणि उपस्थित नागरिकांचे आयोजकांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.


---------------

Post a Comment

0 Comments