शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये स्वा.दादासाहेब उंडाळकर विद्यालयाचे उज्वल यश.
उंडाळे - प्रतिनिधी.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतीने घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयातील इयत्ता सातवी चे सहा विद्यार्थीनी उज्वल यश संपादन केले. इयत्ता सातवीतील 20 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील सहा विद्यार्थी पात्र ठरले. यांना संकेत सुतार, प्रदीप ओंबासे, सौ. ए. जे. पाटील, सौ एस. आर पाटील, राजेंद्र गोरे, रवींद्र भोये, धनंजय पवार, आर. एम. वळवी, शंकर आंबवडे, व्ही. के. भोसले, डी. बी. जाधव, समीर गजबरवाडी आदी शिक्षकांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अँड आनंदराव पाटील उर्फ राजाभाऊ, सचिव बी आर यादव, माजी प्राचार्य बी आर पाटील, प्राचार्य जे एस माळी, पर्यवेक्षक सौ. जे पी. पाटील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.


Post a Comment
0 Comments