बाळ गोपाळांचा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न .
स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर माध्यमिक विद्यालयात व राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने दिंडी सोहळ्याचे आयोजन.
उंडाळे - प्रतिनिधी.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या दिशेने समस्त वैष्णवांचा पायी वारी सोहळा सुरू आहे त्यानिमित्ताने उंडाळे तालुका कराड येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर माध्यमिक विद्यालयात व राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने बाळ गोपाळांचा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात झाला.
दिंडी सोहळा येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणा सुरू झाला श्री विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती व वृक्ष ग्रंथांची यांची दिंडी विद्यालयापासून बाजारपेठ, मुख्य चौक, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, ज्योतिर्लिंग मंदीर या मार्गावरून दिंडी सोहळा निघाला यावेळी विद्यार्थ्यांनी वारकरी वेशात सहभागी होत जनजागृती पर उद्घोघोषणा दिल्या टाळ मृदंग विना पालखी सजवून विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थ यामध्ये सहभागी झाले समाज प्रबोधन अभंग गात वारीची सुरुवात झाली या या निमित्ताने विद्यालयात संतांचे सचित्र चरित्र सांगणारे प्रदर्शन भरवण्यात आले होते त्याचे उद्घाटन प्राचार्य जे. एस माळी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पर्यवेक्षक सौ जे पी पाटील, धनंजय पवार, शंकर आंबवडे, प्रदीप ओंबासे, संकेत सुतार ए. जे पाटील, सौ एस आर पाटील रविंद्र भोये आदींची उपस्थिती होती यामध्ये संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, यांचे चरित्र सांगण्यात आले. या वारीचे ग्रामस्थांनी ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत केले यासाठी रवींद्र भोये, संकेत सुतार, प्रदीप ओंबासे आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले





Post a Comment
0 Comments