महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ कर्ज योजना सुरु.
गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट :-
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय, मुंबई शहर व उपनगर मार्फत २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ५० टक्के अनुदान योजना, बीज भांडवल योजना तसेच थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.अनुसूचितजाती व नवबौद्ध समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक सहाय्य व सामाजिक उन्नतीच्या उद्देशाने महामंडळ विविध स्वयंरोजगाराभिमुख योजना राबवत आहे. प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजना अंतर्गत लाभार्थ्यांच्या स्वयंपूर्णतेला चालना देऊन त्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न या योजनांद्वारे करण्यात येत आहे.लाभार्थ्यांनी https://mpbcdc.maharashtra.gov.in किंवा https://mahadisha.in या संकेतस्थळाच्या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरावेत. अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत. अपूर्ण अथवा कागदपत्रांविना सादर केलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.


Post a Comment
0 Comments