गौतम सातपुते यांचा सेवानिवृती सत्कार.
शिराळा -प्रतिनिधी.
गौतम सातपुते यांचा सेवानिवृती सत्कार बाबासो कांबळे मित्र परिवराच्या वतीने संपन्न झाला. गौतम सातपुते यांनी आपल्या आयुष्याची 43 वर्षे सार्वजनिक बांधकाम विभाग शिराळा येथे प्रामाणिकपणे लोकसेवक म्हणून सेवा पूर्ण केली.गौतम सातपुते साहेब यांनी आपल्या सेवा काळात झालेल्या रस्ते, पूल, इतर विकास कामात इमानदारीने आपलं कर्तव्य बजावले.मंगळवार दि. 30 जून 2026 रोजी नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त झाले. या त्यांच्या कामाचा गौरव म्हणजे त्यांच्या आजवरच्या कामाची पोचपावतीच आहे. या सेवेचा गौरव करणारे इगरूळ (ता. शिराळा )गावचे सामाजिक कार्यकर्ते, मा. बाबासो कांबळे व मित्र परिवार यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी यावेळी मा. बाबासो कांबळे, मा.प्रशांत सातपुते,मा.संतोष ढेकळे मा.जगन्नाथ कांबळे मान्यवर उपस्थित होते.
"43 वर्षे प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्याचा सन्मान करणं हे आपलं सामाजिक कर्तव्य आहे. गौतम सातपुते साहेबांच्या कार्याला आमचा सलाम" असे मत यावेळी बाबासो कांबळे यांनी व्यक्त केले व गौतम सातपुते साहेबांना पुढील निवृत्त आयुष्य सुखी, निरोगी आणि आनंदी जावो यासाठी बाबासो कांबळे व मित्र परिवाकडून हार्दिक शुभेच्छा देऊन अभिनंदन केले."


Post a Comment
0 Comments