Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

प्राचार्य पदी श्री जे. एस. माळी यांची नियुक्ती


स्वा.दादासाहेब उंडाळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य पदी श्री जे. एस. माळी यांची नियुक्ती


 उंडाळे - प्रतिनिधी. 

येथील स्वा.दादासाहेब उंडाळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य पदी श्री जे. एस. माळी (सर )यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे सचिव बी. आर. यादव (सर) यांनी नुकतेच श्री माळी यांना प्रदान केले. श्री माळी हे गेली 30 वर्ष या विद्यालयांमध्ये मराठी विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थी प्रिय शिक्षक व उपक्रमशील शिक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांनी हरित सेना समन्वयक म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याचबरोबर समाज प्रबोधन विविध उपक्रम राबवण्यामध्ये त्यांचा विशेष सहभाग असतो. प्लास्टिक निर्मूलन. कचऱ्याची होळी, झाडांचे रक्षाबंधन, शाडूच्या मूर्ती वापरण्याचेआवाहन. विद्यार्थ्यांनी तयार केलेली नर्सरी, आणि दरवर्षी विद्यार्थ्यांकडून केले जाणारे वृक्षारोपण. या त्यांच्या विविध उपक्रमामुळे ते उपक्रमशील शिक्षक म्हणून ओळखले जातात. तसेच प्राचार्य बी आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबवित असताना विद्यार्थीची गुणात्मक प्रगती साधली. त्यांच्या या कार्यामुळेच विद्यालयाला महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कारही मिळाला आहे.  या सर्व कामाची दखल घेऊन ग्रामीण विकास शिक्षण संस्थेने त्यांना प्राचार्य पदी नियुक्त करत त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे. नियुक्तीपत्र प्रदान करताना विद्यालयाचे माजी प्राचार्य बी. आर. पाटील (सर), संस्थेचे निरीक्षक  व्ही. के.शेवाळे (सर), यासह मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या या निवडीबद्दल ग्रामीण विकास शिक्षण संस्थेची अँड आनंदराव पाटील उर्फ राजाभाऊ, उपाध्यक्ष  शंकरराव  पाटील,सौ. गीतांजली पाटील, खजिनदार विलास माळी, बादशाह शेख,रमेश शेवाळे, दत्तात्रय जाधव, माजी सरपंच दादासाहेब पाटील, गणेश पाटील, शंकर अंबवडे, नरेश शेवाळे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ  आदी अभिनंदन केले.





Post a Comment

0 Comments