Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

करमाळा आयटीआयच्या नामकरणावरून वाद

 करमाळा आयटीआयच्या नामकरणावरून वाद 

भीम आर्मी आक्रमक, मदनदास देवींचे नाव हटवण्याची मागणी

सोलापूर - प्रतिनिधी.

करमाळा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (ITI) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रचारक मदनदास देवी यांचे नाव देण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या नामकरणाला भीम आर्मीने तीव्र विरोध दर्शवला असून, हे नाव बदलले नाही तर राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी या नामकरणावर कडाडून टीका केली आहे. "मदनदास देवी यांचे करमाळ्याच्या जडणघडणीत कोणतेही योगदान नाही, त्यामुळे त्यांचे नाव देण्याचे समर्थन होऊ शकत नाही," असे कांबळे यांनी म्हटले आहे. या विषयावर जाहीर चर्चेचे (डिबेट) खुले आव्हान त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिले आहे.

नामकरणाच्या दिवशी भाजप नेत्यांच्या दौऱ्यामुळे पोलिसांनी आपल्याला जाणूनबुजून नजरकैदेत ठेवले होते, असा गंभीर आरोपही कांबळे यांनी केला. हा प्रकार लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.भीम आर्मीने मदनदास देवींच्या ऐवजी करमाळ्याच्या विकासात आणि समाजकार्यात योगदान देणाऱ्या व्यक्तींची नावे देण्याची मागणी केली आहे. यामध्ये माजी सामाजिक न्यायमंत्री स्वर्गीय दिगंबररावजी बागल, देशभक्त नामदेवराव जगताप, अण्णासाहेब जगताप, रावसाहेब पाटील, गिरिधरदास देवी आणि स्वर्गीय गोविंद बापू पाटील यांसारख्या मान्यवरांच्या नावांचा समावेश आहे.

आमचा महापुरुषांच्या नावांना विरोध नाही, हे स्पष्ट करत भीम आर्मीने यापूर्वी जामखेड, मुंबई आणि कोल्हापूर येथील आयटीआयला अनुक्रमे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांची नावे दिल्याबद्दल त्यांचे समर्थन केले आहे. मात्र, करमाळ्यातील नामांतर त्वरित न बदलल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि भाजप नेत्यांना फिरू दिले जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

पुढील रणनीती ठरवण्यासाठी सर्व पुरोगामी संघटनांची राज्यस्तरीय बैठक लवकरच आयोजित केली जाणार असल्याचे भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

0 Comments