Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

राळेगणसिद्धी येथे राज्यस्तरीय पर्यावरण कार्यशाळेचे आयोजन.

 राळेगणसिद्धी येथे  राज्यस्तरीय पर्यावरण कार्यशाळेचे आयोजन.
                              _____श्री प्रमोद मोरे

उंडाळे -प्रतिनिधी.

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने 5जून 2026 रोजी सकाळी १० वाजता जागतिक पर्यावरण दिन व वृक्षमित्र स्वर्गीय आबासाहेब मोरे यांच्या जयंतीनिमित्त राळेगणसिद्धी येथे राज्यस्तरीय पर्यावरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रमोद मोरे  यांनी दिली. 

या कार्यशाळेसाठी अध्यक्ष म्हणून थोर समाजसेवक पद्मभूषण डॉ. अण्णासाहेब हजारे उपस्थित राहणार आहेत, प्रमुख पाहुणे अहिल्यानगरचे जिल्हा अधिकारी डॉ. पंकज आशिया,यांची उपस्थिती आहे. यावेळी चंद्रकांत शिंदे, पोलीस अधीक्षक आर. मुमक्का सुदर्शन, अँड. सुरेश लगड, शिक्षणाधिकारी श्रीमती संध्या गायकवाड, विभागीय वनाधिकारी अमोल जाधव  इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार असून सर्व मान्यवर पर्यावरण प्रेमींना या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यावरण प्रेमी उपस्थित राहणार आहेत तरी आपणही या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यशाळेतील विचारांची जनजागृती समाजामध्ये व आपण काम करीत असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रात करावी  निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा. श्री प्रमोद( दादा) मोरे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments