Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

ज्येष्ठ नागरिक एक शक्ती असून एकत्र आल्यास आणखी यश मिळेल

 ज्येष्ठ नागरिक एक शक्ती असून एकत्र आल्यास आणखी यश मिळेल : डॉ.सुभाष वाघमारे

सातारा : प्रतिनिधी.

 समाजात युवा, श्रमिक,बहुजन अशा अनेक प्रकारच्या शक्ती आहेत.त्यामध्ये अनुभवी अशी ज्येष्ठ नागरिक हीसुद्धा शक्ती आहे.तेव्हा सर्व शक्ती एकत्र आल्यास नक्कीच यश मिळू शकेल.असे प्रतिपादन डॉ.सुभाष वाघमारे यांनी केले.येथील सम्यक ज्येष्ठ नागरिक संघातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील सांस्कृतीक सभागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.तेव्हा प्रमुख वक्ते म्हणून माजी उपप्राचार्य डॉ.प्रा. सुभाष वाघमारे मार्गदर्शन करीत होते.अध्यक्षस्थानी शामराव बनसोडे होते.

      डॉ.सुभाष वाघमारे म्हणाले,"ज्येष्ठ नागरिक हे जीवनाचे अर्थात,अनुभवाचे विद्यापीठ आहे.खरोखरच ते शिव,फुले, शाहू,आंबेडकर विचारधारेवर कार्यरत आहेत.त्यांनी कर्तबगार पिढी घडविण्यासाठी साह्य केले पाहिजे.सतत नवनवीन ज्ञान आत्मसात करून चांगुलपणा राखला पाहिजे.आजची स्थिती भयानक असल्याने खरे व हिताचे बोलले पाहिजे.सध्याचे शासन तेढ निर्माण करीत आहे. भारत जोडण्याऐवजी तोडण्याचेच काम ते पद्धतशीर करीत असल्याने बहुजनांनी ऐक्यास तडा जाणार नाही.याची काळजी घ्यावी.त्यांनी आपली वाचा घालवली आहे.तरीही मुक्याने बोललेच पाहिजे. राजकारण हे सार्वजनिक व डोळस असावे. दिशाहीन झाले तर अडचणीचे ठरेल. तेव्हा बंधुभाव राखण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे आले पाहिजे. निर्व्यसनी समाज निर्माण करण्यासाठी ज्येष्ठांनी कार्यरत राहिले पाहिजे.संविधान महत्वपूर्ण असे काम करीत आहे.समाजात उन्नती व ज्ञान वाढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.स्वार्थ न साधता जनजागृती सातात्याने करावी. व्यक्तिपूजा करू नये.तरच सार्वजनिक हितकारक कामे होतील. गुलामगिरीला मूठमाती देऊन स्वतंत्र असे व्यवसाय करून प्रगती साधली पाहिजे. विशाल दृष्टिकोन ठेवून सम्यक चळवळ निर्माण झाली पाहिजे. मी पणा कमी करून चिकित्सकपणे बहुजनांनी संघटित झाले पाहिजे. महापुरुषांचे चरित्र वाचुन कृतीयुक्त वाटचाल केली पाहिजे.प्रतिगामी शक्ती जातीयवादी बनत आहेत. उपवर्गीकरण जोडून ठेवले पाहिजे.समतावादी केंद्र निर्माण झाली पाहिजेत.स्वयंप्रकाशीत झाले पाहिजे.त्यासाठी नित्यनियमाने कार्यरत राहिले पाहिजे."

        चंद्रकांत खंडाईत म्हणाले,"लढ म्हणण्याची उम्मीद कुटुंबाबरोबरच ज्येष्ठ नागरिक देत असतात.शिव,फुले,शाहू, आंबेडकर विचार धारा आत्मसात केल्याने त्यांना दिर्घआयुष मिळाले असून ते शतायुष होतील." अध्यक्षस्थानावरून बोलताना शामराव बनसोडे म्हणाले, "गेल्या ११ वर्षांपासून आम्ही वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम राबवत आहोत.त्यामध्ये धम्म पर्यटन करीत असतो.वर्षावास कार्यक्रम राबवले जातात. अनेकांचे वाढदिवस,गरजू व्यक्तींना मदत असे नानाविध उपक्रम आहेत."

            प्रथमतः डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.वंदना सामुदायिक घेण्यात आली. सरकारी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला.यावेळी मान्यवरांचे स्वागत व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. ७५ वर्षे पूर्ण व पदार्पण केलेल्या सभासदांचाही सत्कार करण्यात आला.या सर्वांमध्ये डॉ.सुभाष बनसोडे, चंद्रकांत खंडाईत, यशपाल बनसोडे, बी.एल.माने,गोपीनाथ कांबळे, नवनाथ लोंढे,विजय निकम, मधुकर भोसले,व्ही.बबन दाम्पत्य,गणेश कारंडे,मुरलीधर खरात,रामचंद्र गायकवाड, पो.दीपक रणदिवे, सिद्धार्थ म्हस्के,उज्वला कांबळे, महादेव सोनवणे, आप्पा खरात, अंकुश धाइंजे,विश्वास सावंत, विजयराव गायकवाड, डॉ. आदिनाथ माळगे,अरुण साळुंखे,मनोहर पवार,जगन्नाथ गायकवाड,अशोक भोसले, अशोक कांबळे,तानाजी सावंत, प्रकाश सावंत,प्रकाश रणबागले,शहाजी वाघमारे वाघमारे,सुभाष सोनावणे, विलास कांबळे, पंढरीनाथ मंडले,सीताराम गायकवाड, पी.डी.साबळे,दादासाहेब केंगार,अनिल वीर आदी ज्येष्ठासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यथोचित असा सत्कार करण्यात आला.

       एस.एस.सी.परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवुन सुयश संपादन केल्याबद्धल  प्रांजली प्रमोद कांबळे,अवंतिका शिवाजी ताटे व अनुष्का राजेंद्रकुमार साळुंखे यांचाही पुस्तक व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. आहे. सदरच्या कार्यक्रमास सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते. बी.एल. माने यांनी प्रास्ताविक  केले.दादासाहेब केंगार यांनी पाहुण्यांच्या परीचयासह सूत्रसंचालन केले तर अरुण साळुंखे यांनी आभार मानले. सरतेशेवटी स्नेहभोजनांनी सांगता करण्यात आली.



Post a Comment

0 Comments