लोकनेते बाबासाहेब चोरेकर यांच्या पुतळ्याचे अनावरण.
कराड - प्रतिनिधी.
चोरे ता.कराड येथे,कराड तालुका पंचायत समितीचे माजी सभापती तसेच श्री.वाग्देवी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक स्व. राजाराम पांडुरंग साळुंखे उर्फ लोकनेते बाबासाहेब चोरेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा शंभूराज देसाई यांच्या हस्ते संपन्न झाले. बाबासाहेब चोरेकर यांनी शिक्षण, समाजकारण आणि ग्रामीण विकासाच्या माध्यमातून परिसराच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. त्यांनी उभारलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा ठसा आजही जनमानसावर कायम असून त्यांचे विचार आणि कार्य भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहेत.याप्रसंगी मा. मकरंद पाटील (आबा), मा. बाळासाहेब पाटील, अँड. उदयसिंह पाटील, श्रीमती निर्मला राजाराम साळुंखे चोरेकर तसेच उपस्थित मान्यवर, पदाधिकारी, ग्रामस्थ आणि कार्यकर्ते उपस्थित होते . उपस्थितांनी लोकनेते बाळासाहेब चोरेकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून त्यांच्या विकासाभिमुख विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.




Post a Comment
0 Comments