Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासन केंद्रास मंत्री शंभूराज देसाई यांची भेट.

लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासन केंद्रास मंत्री शंभूराज देसाई यांची भेट.

 कोल्हापूर - प्रतिनिधी.

 शिवाजी विद्यापीठातील लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाच्या कामकाजाचा आढावा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी  घेतला. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या दूरदृष्टीमुळे आणि अथक प्रयत्नांमुळे शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली. त्यांचे विचार, कार्य आणि समाजासाठीचे योगदान नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.यासाठी अध्यासनामार्फत प्रत्येक जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये कार्यशाळा, व्याख्याने आणि विविध उपक्रम व्यापक स्वरूपात राबविण्याच्या सूचना दिल्या. तसेच आधुनिक तंत्रज्ञान आणि समाजमाध्यमांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील युवकांपर्यंत लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कार्याचा प्रेरणादायी वारसा पोहोचविण्याबाबतही चर्चा केली.लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाच्या उपक्रमांसाठी राज्य शासनाकडून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, याची ग्वाही यावेळी दिली. तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई दालन उभारणीचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याच्या सूचनाही विद्यापीठ प्रशासनाला दिल्या.लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे कार्य आणि विचार आगामी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरावेत, यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.



Post a Comment

0 Comments