मंत्री शंभूराज देसाई यांचा अभ्यास भेट व जनसंवाद कार्यक्रम संपन्न.
पाटण - प्रतिनिधी.
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दौलतनगर ता. पाटण येथे आयोजित अभ्यागत भेट व जनसंवाद कार्यक्रमात परिसरातील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला . नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्ते, वीज, महसूल विषयक प्रश्न, शासकीय योजनांचा लाभ तसेच विविध विकासकामांबाबत मांडलेल्या समस्या व मागण्या जाणून घेतल्या. जनतेचे प्रश्न वेळेत मार्गी लागावेत यासाठी संबंधित यंत्रणांमार्फत आवश्यक कार्यवाही करण्यास प्राधान्य दिले जाईल.यावेळी मुंबई पोलीस दलात निवड झालेल्या कु. सानिका भिसे (नाडे) आणि सौ. प्रियांका पानस्कर (मल्हारपेठ) यांचा सत्कार करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील आपल्या मुली विविध क्षेत्रांत यश मिळवत आहेत, ही अभिमानाची बाब आहे.तसेच कराटे, म्हावशी आणि मारुल तर्फे पाटण परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करून पक्षावरील विश्वास व्यक्त केला. सर्व नवप्रवेशितांचे मनःपूर्वक स्वागत करत त्यांच्या सहकार्याने जनतेची सेवा आणि विकासाची वाटचाल अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला.दौलतनगर परिसरातील नागरिकांना थेट संवादातून आपल्या समस्या मांडण्याची संधी मिळाली, याचा आनंद आहे. जनतेचा विश्वास, लोकसेवा आणि विकास हीच माझ्या कार्याची प्रेरणा असून सर्वसामान्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सदैव कटिबद्ध राहीन.


Post a Comment
0 Comments