Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

आगामी काळातही शेतकरी, सभासद आणि कामगारांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणार.___ डॉ.सुरेशबाबा भोसले.

 आगामी काळातही शेतकरी, सभासद आणि कामगारांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणार.___ डॉ.सुरेशबाबा भोसले.

कराड - प्रतिनिधी.

य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शेरे येथे प्रचार सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. यावेळी डॉ. सुरेशबाबा भोसले  यांनी उपस्थित सभासद, शेतकरी बांधव आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. गेल्या ११ वर्षांत कारखान्याने आर्थिक स्थैर्य, उत्पादन क्षमतेत वाढ आणि सभासद हिताला प्राधान्य देत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. शेतकरी सभासदांना वेळेवर देयके, ऊस उत्पादकांच्या हिताचे निर्णय, कामगार कल्याण आणि विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले आहेत. यापुढील काळातही कारखान्याची प्रगती कायम ठेवत शेतकरी, सभासद आणि कामगारांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, तसेच विकासाची ही घोडदौड अधिक वेगाने सुरू राहील, असा विश्वास उपस्थितांना दिला.कारखान्याची ही यशस्वी वाटचाल सभासदांच्या विश्वासामुळेच शक्य झाली असून, पुढील काळातही शेतकरी आणि सभासदांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून अधिक सक्षम, प्रगत आणि लोकाभिमुख कारभार करण्यासाठी सहकार पॅनेल च्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments