Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

मराठा आरक्षण अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी उपसमितीची बैठक संपन्न.

मराठा आरक्षण अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी उपसमितीची बैठक संपन्न.

गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट :-

मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत तसेच संबंधित विषयांवरील शिफारशींच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी गठित मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक आज मंत्रालयात पार पडली.उपसमितीचे अध्यक्ष तथा जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री मा. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उपसमितीचे सदस्य  उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाल्या. मराठा समाजाच्या हिताशी संबंधित विविध मुद्द्यांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील, उद्योग मंत्री मा. उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मा. मकरंद जाधव पाटील, सहकार मंत्री मा. बाबासाहेब पाटील, फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री मा. भरत गोगावले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मा. नरेंद्र अण्णासाहेब पाटील तसेच आमदार मा. प्रसाद लाड उपस्थित होते.यावेळी सामाजिक न्याय विभाग, गृह, वित्त, नियोजन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, बार्टीचे महासंचालक, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच संबंधित समित्यांचे अध्यक्ष दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.मराठा समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासन कटिबद्ध असून, समाजाच्या न्याय्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी आवश्यक निर्णय व उपाययोजनांवर प्रभावीपणे कार्यवाही करण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.



Post a Comment

0 Comments