अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भात विचारांची लढाई झाली पाहिजे
सातारा : प्रतिनिधी.
अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरणबाबत विचारांची लढाई झाली पाहिजे. असे प्रतिपादन संजय (तात्या) गाडे यांनी केले.आरक्षणाचा लाभ वंचित व अतिमागास घटकांपर्यंत पोहोचवावा.या प्रमुख मागणीसाठी मातंग समाजाच्यावतीने लढा उभारला जात आहे.त्या पार्श्वभूमीवर मात्र,मातंग व बौद्ध यांच्यात सामंजस्याचे वातावरण राहिले पाहिजे.यासाठी आंबेडकरवादी असणाऱ्या व्यक्तींची दुसरी सहविचार सभा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर मोठ्या उत्साहात संपन्न झाली.तेव्हा गाडे बोलत होते.
संजय गाडे म्हणाले,"आपले शत्रू व मित्र कोण आहेत ? हे ओळखले पाहिजे.गोलमेज परिषदेसाठी वेगवेगळ्या विषयांवर बोलणारे तज्ञ यांना पाचारण केले पाहिजे. उदा. विधीज्ञ,समाजसेवक,महापुरुषांचे पूर्ण विचार आत्मसात करणाऱ्या व्यक्ती आदी होत. आमच्या पक्षाच्या आदेशानुसार आरक्षण उपवर्गीकरण विरोधी आंदोलन छेडण्यात येणार आहे."
ऍड.दयानंद माने म्हणाले, "जातनिहाय नंतर उपवर्गीकरण झाले पाहीजे.असे आमच्या पक्षाच्या नेतृत्वाने निर्णय घेतला असून आम्ही त्यांच्या विचारानुसार वाटचाल करू.तरीसुद्धा मी व्यक्तिशः आपल्याबरोबर आहोत. समाजाचा घटक म्हणून विरोधच करणे गरजेचे आहे.या षंढयंत्रामध्ये भाजपा आहे.या लढ्यात इतर बहुजन समाजातील जातींचा समावेश असला पाहिजे."
दादासाहेब ओव्हाळ म्हणाले,
"सध्या समाजात अस्वस्थता पसरली आहे.आपण मोठा भाऊ म्हणून मातंग किंवा इतरांना सोबत घेऊन वाटचाल केली पाहिजे."विशाल भोसले म्हणाले,"गोलमेज परिषदेच्या माध्यमातून फायदे-तोटे सांगितले पाहिजेत."यावेळी संजय नितनवरे,सतीश गाडे आदींनी मनोगत व्यक्त केले.
आणखी अंतिम सहविचार सभा घेऊन गोलमेज परिषद घेण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.मातंग व बौद्ध यांच्यात सामंजस्यपणा व एकोपा राखण्यावर भर देण्यात येणार असून या चळवळीत सच्चे आंबेडकरवादी यांनी सामील व्हावेत.असा सर्वच उपस्थितांचा सूर होता.संघटना, जात व पक्षविरहित आंबेडकरवाद्यांनी एकत्र येण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.त्यामुळे पक्ष-संघटनेचा उल्लेख टाळण्यात आला आहे. अनिल वीर यांनी यांनी प्रास्ताविकपर आढावा घेवुन सविस्तर माहिती कथन केली.सदरच्या सभेस रेखा सकटे,मदन खंकाळ,रमेश गायकवाड,दीपक चव्हाण, चंद्रकांत खंडाईत,राम मदाळे, संदीप कांबळे,गौतम रणदिवे, आशुतोष वाघमोडे,ऍड. विलास वहागावकर,डॉ.अरुण गाडे, अनिल धोत्रे,सचिन शेंडगे,किरण बोभाटे,शाहीर किरण जगताप, तुकाराम गायकवाड, महादेव मोरे आदी विविध पक्ष-संघटनेचे पदाधिकारी, प्रतिनिधी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments