Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

कासेगाव येथे पावसाळ्यापूर्वी ओढे-नाले स्वच्छतेचे काम सुरू

 कासेगाव  येथे पावसाळ्यापूर्वी ओढे-नाले स्वच्छतेचे काम सुरू

कासेगाव - प्रतिनिधी.

कासेगाव (ता. वाळवा)  आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कासेगाव ग्रामपंचायतीने ओढे व नाले स्वच्छ करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. पावसाळ्यात पाणी साचू नये, पूरस्थिती निर्माण होऊ नये आणि गावातील नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे.ग्रामपंचायतीमार्फत जेसीबीच्या साहाय्याने ओढे-नाल्यांमधील गाळ, प्लास्टिक कचरा व झाडाझुडपांची सफाई करण्यात येत आहे. यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत होऊन पावसाचे पाणी अडथळ्याविना वाहून जाण्यास मदत होणार आहे. गावातील विविध भागांमध्ये टप्प्याटप्प्याने हे काम सुरू असून, लवकरच संपूर्ण गावातील नाले स्वच्छ करण्याचे नियोजन आहे.ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांनी सांगितले की, “पावसाळ्याच्या आधीच स्वच्छतेची कामे पूर्ण करण्यावर आमचा भर आहे, जेणेकरून नागरिकांना पावसाळ्यात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.” तसेच ग्रामस्थांनीही कचरा नाल्यात टाकू नये व स्वच्छतेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.या उपक्रमामुळे कासेगावमध्ये स्वच्छता वाढण्यासोबतच पावसाळ्यातील संभाव्य समस्या टाळण्यास मदत होणार असल्याचे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments