जयवंतराव भोसले सहकार पॅनलची वांगी येथे भव्य जाहीर सभा.
कडेगाव - प्रतिनिधी
य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ वांगी येथे भव्य जाहीर सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या सभेला सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.यावेळी कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेशबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ११ वर्षांत कारखान्याने केलेली प्रगती, सभासद व शेतकरी हितासाठी राबविण्यात आलेले विविध विकासात्मक निर्णय, आर्थिक बळकटी तसेच भविष्यातील महत्त्वाकांक्षी योजनांचा सविस्तर आढावा मांडला.शेतकरी, सभासदांच्या विश्वास, सहकार्य आणि पाठबळाच्या बळावर सुरू असलेली प्रगतीची वाटचाल अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या सर्व अधिकृत उमेदवारांना येत्या २१ जून रोजी “कपबशी” चिन्हासमोर शिक्का मारून भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.याप्रसंगी श्री. पृथ्वीराज देशमुख, श्री. संग्राम देशमुख, पैलवान चंद्रहार पाटील, सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन दिलीप सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश मोहिते यांच्यासह शेतकरी, ऊस उत्पादक, सभासद, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments