Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

मंत्री शंभूराज देसाई यांनी केलं पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत.


 मंत्री शंभूराज देसाई यांनी केलं पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत.

 पाटण - प्रतिनिधी.

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मरळी ता. पाटण  येथे शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्या विद्यार्थी मित्र-मैत्रिणींचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मोठ्या उत्साहात केलं.विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी, शाळेशी आपुलकी वाढावी यासाठी त्यांच्याशी संवाद साधत विविध प्रश्न विचारले. मुलांनीही अतिशय आत्मविश्वासाने व उत्साहाने उत्तरे देत आपली गुणवत्ता दाखवून दिली.यावेळी बैलगाडी सजवून विद्यार्थ्यांना शाळेत आणण्याचा सुंदर उपक्रम राबविण्यात आला. ग्रामीण संस्कृतीची जपणूक करत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून समाधान वाटले.शिक्षण हेच उज्ज्वल भविष्यासाठीचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने मन लावून शिक्षण घेत आपल्या कुटुंबासह गाव आणि राज्याचे नाव उज्ज्वल करावे, हीच अपेक्षा व्यक्त केली.याप्रसंगी शिक्षकवृंद, ग्रामस्थ, पालक व नागरिक उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments