य. मो. कृष्णा सह. साखर कारखाना निवडणूक प्रचारार्थ विंग जाहीर सभा संपन्न.
कराड - प्रतिनिधी.
य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने विंग येथे आयोजित सभेत मोठ्या संख्येने सभासद, ऊस उत्पादक आणि कार्यकर्ते सहभागी झाले. यावेळी कारखान्याच्या आतापर्यंतच्या वाटचालीबरोबरच आगामी काळातील नियोजनावर संवाद साधला.कारखान्याने सातत्यपूर्ण नियोजन, पारदर्शक कारभार आणि शेतकरी-केंद्रित धोरणांच्या जोरावर प्रगतीची नवी उंची गाठली आहे. सभासदांचा विश्वास, कामगारांचे योगदान आणि शेतकऱ्यांचे सहकार्य हीच या यशामागील खरी ताकद असल्याची भावना व्यक्त केली.सहकाराची परंपरा अधिक बळकट करण्यासाठी कपबशी चिन्हासमोर शिक्का मारून सहकार पॅनेलला विजय मिळवून देण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.


Post a Comment
0 Comments