Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

कासेगाव पोलिस स्टेशनच्या वतीने आयोजित सायकल रॅली उत्साहात संपन्न.

कासेगाव पोलिस स्टेशनच्या वतीने आयोजित सायकल रॅली उत्साहात संपन्न.

सांगली जिल्हा पोलीस दल यांच्या वतीने ‘फिट इंडिया – सायकल 2026’ या उपक्रमांतर्गत सायकल रॅलीचे आयोजन.

कासेगाव : प्रतिनिधी.

 सांगली जिल्हा पोलीस दल यांच्या वतीने ‘फिट इंडिया – सायकल 2026’ या उपक्रमांतर्गत कासेगाव पोलिस स्टेशनच्या वतीने उत्साहात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते . या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता.कासेगाव पोलिस स्टेशन येथून सकाळी रॅलीची सुरुवात करण्यात आली. या रॅलीत पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सहभागी सर्वांनी “फिट रहा, हिट रहा” आणि “देशासाठी सदैव तत्पर रहा” असा संदेश दिला.देशभरात ‘फिट इंडिया’ मोहिमेद्वारे सायकलिंगसारख्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले जात असून, यामुळे आरोग्य सुधारण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.या रॅलीदरम्यान वाहतुकीचे नियम पाळणे, नियमित व्यायाम करणे आणि सायकलचा वापर वाढवणे याबाबत जनजागृती करण्यात आली. कासेगाव पोलिस स्टेशनच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ होत असून, समाजात सकारात्मक संदेश पसरत असल्याचे दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments