कृष्णा कारखान्याच्या सभासदांचा संवाद मेळावा संपन्न.
य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचारार्थ सोनहिरा साखर कारखान्यावर.
ब्युरो रिपोर्ट गोंडवाना न्यूज :-
य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकनेते स्व. डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना, वांगी परिसरातील स्व. कदम साहेबांच्या “लोकतीर्थ” या स्मृतिस्थळी आयोजित सभासद संवाद मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
सहकार क्षेत्राला लोकचळवळीचे स्वरूप देत ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर कार्य करणारे डॉ. पतंगराव कदम यांचे योगदान आजही प्रेरणादायी आहे. शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या उन्नतीसाठी त्यांनी उभारलेल्या सहकार, शिक्षण व सामाजिक संस्थांनी विकासाचा नवा आदर्श निर्माण केला. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे मत व्यक्त केले.सहकाराची मूल्ये जपत शेतकरी, सभासद आणि कारखान्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करून विकासाची ही यशस्वी परंपरा अधिक बळकट करावी. सभासदांचा विश्वास आणि सहकार्य यांच्या बळावर कारखान्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.याप्रसंगी डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.आ. मोहनराव कदम (शेठ), आमदार डॉ. विश्वजीत कदम, य. मो. कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन श्री. मदनदादा मोहिते (दादा) आणि डॉ. इंद्रजित मोहिते, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, सागरेश्वर सूतगिरणीचे माजी चेअरमन डॉ. शांताराम (बापू) कदम, श्री. रघुनाथराव कदम, कडेगाव पंचायत समिती सभापती डॉ. जितेश कदम, कडेगाव पंचायत समिती सदस्य श्री. दिग्विजय कदम, सुदन मोहिते यांच्यासह शेतकरी बांधव, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment
0 Comments