महिला महाविद्यालयात माजी विद्यार्थिनी मेळावा संपन्न.
कराड - प्रतिनिधी.
शिक्षण मंडळ कराड संचलित महिला महाविद्यालय कराड येथे माजी विद्यार्थिनी संघ आयोजित माजी विद्यार्थिनी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कुंडीतील रोपाला मान्यवरांच्या हस्ते पाणी देऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. ज्योती पाटील अध्यक्ष माजी विद्यार्थी संघ महिला महाविद्यालय कराड यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रो. उज्वला ताटे, सौ. ज्योती पाटील अध्यक्ष माजी विद्यार्थिनी संघ, सौ स्मिता सावंत, सौ.वैशाली सुभेदार, कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.श्वेता यादव हिची महाराष्ट्र पोलीस पदी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न झाला. माजी विद्यार्थिनी संघ आयोजित माजी विद्यार्थ्यांनी मे ळावा यास उपस्थित असणाऱ्या सौ. स्वप्ना केतकर, सौ. शोभा पाटील, श्रीमती प्रतीक्षा भाडळकर, तेजस्विनी जोशी, स्वाती कलबुर्गी यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद डॉ. भरत बजरंग बल्लाळ प्राचार्य महिला महाविद्यालय कराड यांनी भूषवले. माजी विद्यार्थिनींच्या मनोगतनंतर डॉ. भरत बजरंग बल्लाळ यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आभार डॉ. अखिलेश शिंदे यांनी केलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विलास सखाराम सुर्वे व प्रा. किशोर गुजर यांनी केलं. कार्यक्रमासाठी विद्यार्थिनी प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.




Post a Comment
0 Comments