Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (BRSP) चेंबूर वॉर्ड 150 कार्यालयाचे उद्घाटन संपन्न.

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (BRSP) चेंबूर वॉर्ड 150 कार्यालयाचे उद्घाटन संपन्न.

मुंबई - प्रतिनिधी.

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (BRSP) चेंबूर वॉर्ड 150 येथील नव्या कार्यालयाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. डॉ. सुरेश माने साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात पक्षाच्या आगामी वाटचालीवर मार्गदर्शन करताना मान्यवरांनी फुले-शाहू-आंबेडकर विचारांच्या आधारे समाजकारण आणि राजकारण अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.यावेळी राष्ट्रीय महासचिव ॲड. दिनेश राजभर, महाराष्ट्र युवा आघाडी अध्यक्ष पंकज चाळके, मुंबई महिला आघाडी अध्यक्ष ॲड. माया हिरे, वत्सला हिरे, डॉ. बाळासाहेब आढांगळे, बाबासाहेब चंदनशिवे, राजाराम आढाव, सतेश मस्के, धनंजय तूपलोंढे, धीरज कांबळे, दिपक घोडेस्वार, शरद पवार, प्रशांत आढाव, अमर भंडारे, सुशांत शेलार, मेघना खांकाळ, किर्ती चौगुले तसेच अनेक युवा पुरुष व महिला सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, पक्षाने सामाजिक न्याय, समानता आणि बहुजन हिताच्या मुद्द्यांवर ठाम भूमिका घेत, एक सक्षम पर्याय म्हणून पुन्हा नव्या जोमाने मैदानात उतरण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. मुंबई प्रदेश अध्यक्ष दिपक मंगेश चौगुले यांनी सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.







Post a Comment

0 Comments