आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचा सत्कार.
उंडाळे - प्रतिनिधी.
य. मो. कृष्ण सहकारी साखर कारखाना लि. बुद्रुक कारखान्याच्या शेतकरी सभासद संवाद मेळावा सवादे ता. कराड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सभासद संवाद मेळाव्यास प्रमुख पाहुणे कराड दक्षिणचे आश्वासक आमदार डॉ. अतुलबाबा भोसले हे होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. सुरेश भोसले (बाबा ) हे होते.प्रमुख उपस्थिती मा. जगदीश जगताप (दादा ) व्हॉइस चेअरमन एम ओ कृष्णा सहकारी साखर कारखाना लि. रेठरे बुद्रुक, मा. दयानंद पाटील संचालक य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखाना लि. रेठरे बुद्रुक, याचबरोबर कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून साळशिरंबे ग्रामस्थांनी कराड दक्षिणचे आश्वासक आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचा सत्कार केला. वाकुर्डे जलसिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी वीज बिल भरून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील येळगाव जिल्हा परिषद गटातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याबद्दल, वाकुर्डे जलसिंचन योजना सौर उर्जेवर कार्यान्वित करण्याच्या निर्णयाबद्दल, सौर ऊर्जा पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांची व्याप्ती कराड दक्षिण मतदार संघात वाढवण्यासाठी कृष्णा बँक आणि सहकार महर्षी मा.जयवंतराव भोसले पतसंस्था यांच्यामार्फत कर्जपुरवठा उपलब्ध करून घर तिथे सौर ऊर्जा या योजनेला कराड दक्षिण मध्ये उपलब्ध केल्याबद्दल साळशिरंबे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी मा. प्रकाश पाटील (मा. चेअरमन वि.का.स.सेवा सोसायटी साळशिरंबे ), मा. विक्रम राऊत, मा. जयवंत पाटील (दादा),मा. जयवंत यादव (आबा )मा. आबासो शेंडगे, मा. धनाजी साठे,मा.शरद साळुंखे,मा.गणेश साठे,मा. प्रवीण चोपडे,मा.गौरव चोपडे,मा. प्रकाश पाटिल यांची प्रमुख उपस्थिती होती.


Post a Comment
0 Comments