आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांची मलकापूर पाणीपुरवठा विभागास भेट.
कराड - प्रतिनिधी.
मलकापूर नगरपरिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या २४x७ नळ पाणीपुरवठा योजनेची आगाशिवनगर येथे भेट देऊन डॉ. अतुलबाबा भोसले यांनी पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून योजनेच्या कामाची माहिती घेत नागरिकांना स्वच्छ, नियमित आणि मुबलक पाणीपुरवठा मिळावा यासाठी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला.या योजनेमुळे मलकापूर शहरातील नागरिकांची पाण्यासाठी होणारी गैरसोय दूर होऊन भविष्यात अधिक सक्षम आणि शाश्वत पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण होण्यास मदत होणार आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा अधिक चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहे.यावेळी नगरपंचायत चे सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments