Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

सहकार महर्षी जिजाबा आण्णा जाधव यांचा स्मृतिदिन व भव्य शेतकरी मेळावा संपन्न .

 सहकार महर्षी जिजाबा आण्णा जाधव यांचा स्मृतिदिन व भव्य शेतकरी मेळावा संपन्न .

सातारा -प्रतिनिधी.

सहकार महर्षी जिजाबा आण्णा जाधव 44 वा स्मृतिदिन व भव्य शेतकरी मेळावा, स्वर्गीय जिजाबा आण्णा स्मारक समिती गोवे, श्री कोटेश्वर शिक्षण प्रसारक संस्था गोवे ,सहकार महर्षी जिजाबा आण्णा  जाधव विकास सेवा सोसायटी गोवे व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक 26/ 5 /2026 रोजी गोवे ता. जि. सातारा येथे संपन्न झाला .या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले , प्रमुख उपस्थितीमध्ये मा. खासदार उदयनराजे भोसले,मा.डॉ. सौ. प्रियाताई शिंदे (अध्यक्ष जिल्हा परिषद सातारा) मा. श्री राजू भैय्या भोसले (उपाध्यक्ष जिल्हा परिषद सातारा) मा. सौ.लता कर्णे (सभापती कृषी पशुसंवर्धन व दुग्ध शाळा समिती जि. प. सातारा )मा. श्री.महेश गाडे (सभापती पंचायत समिती सातारा ) मा.सुनील काटकर ,सचिन नलावडे ,विनीत पाटील,प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी शेतीतज्ञ उपस्थित होते.

शेतकरी मेळाव्यास मार्गदर्शन करताना डॉ. प्रियाताई शिंदे म्हणाल्या शेतकऱ्यांनी अत्याधुनिक शेतीसाठी तसेच शेतातील उत्पादन वाढीसाठी ए.आय तंत्रज्ञानाचा वापर करून शेतातील मातीचे परीक्षण ,आणि शेतातील पिकासाठी त्याचा योग्य वापर करण्याची काळजी काळाची गरज आहे .शेतातील सुपीकता टिकवण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर आणि जैविक खतांचा वापर करणे गरजेचे आहे .याशिवाय उसाची पाचट न जाळता ती बारीक करून शेतातच कुजवली पाहिजे. महाराष्ट्र शासनाच्या महाविस्तार या ॲपचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी वापर केला पाहिजे या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी सखोल मार्गदर्शन मिळून  शेतातील उत्पादन वाढीसाठी फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे सेंद्रिय शेती करून शेतकऱ्यांनी आपली शेती विषमुक्त केली पाहिजे, तसेच लोकांनी सोयाबीन तेलाचा वापर करताना मर्यादा बाळगा कारण डायबिटीस चे मूळ हे सोयाबीन तेल आहे हे आपल्या आरोग्यासाठी घातक आहे ,असेही डॉ. प्रियाताई शिंदे म्हणाल्या. सहकार महर्षी जिजाबा आण्णा  जाधव यांनी शेतकऱ्यांना शेतीतील उत्पादन वाढीसाठी तसेच शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जे मोलाचे कार्य केले आहे हेच कार्य आज तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम नंदाभाऊ जाधव भुजंगराव जाधव व त्यांचे सर्व सहकारी करत आहेत असे डॉक्टर प्रियाताई शिंदे म्हणाल्या. श्री प्रदीप चवंडीकर यांनी शेतीमध्ये एआय टेक्नॉलॉजीचा उपयोग कसा करता येईल याचे मॉडेलच्या साह्याने खूप छान असे सादरीकरण केले. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पावसाच्या अंदाजाबाबत व वर्षभरातील पावसाबाबत मार्गदर्शन करून पिकांची पेरणी कधी करावी याविषयी माहिती दिली. शेतकरी मेळाव्यात विविध कंपन्यांचे ट्रॅक्टर्स व अवजारे यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्याचबरोबर भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते .या शिबिरात बऱ्याच तरुणांनी रक्तदान करून एक आदर्श निर्माण केला. बुधवार दिनांक 27 मे रोजी  स्वर्गीय जिजाबा आण्णा स्मारक समिती गोवे, श्री कोटेश्वर देवस्थान ट्रस्ट गोवे श्री कोटेश्वर शिक्षण संकुल व सेवाभावी ट्रस्ट सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते, या शिबिराचा लाभ  76 महिलांनी घेतला. या शिबिरातून महिलांमध्ये आरोग्य विषयक माहिती व जागृती निर्माण करता आली.अध्यक्षीय भाषणात मदनदादा भोसले यांनी शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून सहकार महर्षी  जिजाबा आण्णांच्या कार्याला उजाळा दिला .यावेळी महेश गाडे, राजूभैया भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. राजूभैया भोसले यांनी गावाच्या व शाळेच्या विकासासाठी मदतीचे आश्वासन दिले .कार्यक्रमासाठी जि प सदस्य सर्जेराव सावंत ,अजिंक्यताराचे व्हाईस चेअरमन नामदेवराव सावंत, चंद्रकांत इंगवले, भैय्यासाहेब जाधवराव, तुकाराम जाधव, मानसिंग शिंगटे, मधुकर शिंदे ,परिवर्तनचे अशोक भाऊ जाधव, दादासाहेब बडदरे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन जगताप सर यांनी केले तर प्रास्ताविक भुजंगराव जाधव यांनी केले  आभार चंद्रकांत इंगवले यांनी मानले.

Post a Comment

0 Comments