Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

शिरवळच्या माने बंधूंच्या चॅम्पियन करिअर अकॅडमीचा डंका.

शिरवळच्या माने बंधूंच्या चॅम्पियन करिअर अकॅडमीचे उज्ज्वल यश.

सातारा - प्रतिनिधी.

शिरवळ ता. खंडाळा, जि. सातारा  या ग्रामीण भागातील अत्यंत कमी कालावधीत नावलौकिक प्राप्त केलेल्या ज्ञानेश्वर माने व नवनाथ माने यांनी चालवलेल्या चॅम्पियन करिअर अकॅडमी पंढरपूर फाटा शिरवळ या अकॅडमीचे तब्बल 13 प्रशिक्षणार्थी सन 2026 मध्ये मुंबई शहर पोलीस दलात भरती झाले.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून संघर्ष करून गरीब घरची मुले, मुली पोलीस दलात भरती होण्यामध्ये माने बंधूंच्या चॅम्पियन करिअर अकॅडमीचा मोलाचा सहभाग असल्याचे दिसून येते. अकॅडमीच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, मैदानी खेळात वैयक्तिक लक्ष, ग्रामीण भागातील सर्व मुलाबद्दल असलेली तळमळ यातूनच हे नेत्र-दीपक यश संपादन झाले आहे.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना चॅम्पियन करिअर अकॅडमी चे सर्वेसर्वा प्रमुख श्री. ज्ञानेश्वर माने व नवनाथ माने या बंधूंनी कठोर परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. अकॅडमीचे  विद्यार्थीप्रिय गणित विषयाचे तज्ञ व्यक्ती म्हणून काम करणारे अनुभवी मार्गदर्शक श्री.प्रीतम चोपडे यांनी गणित हा विषय अतिशय ओघवती शैलीमध्ये विद्यार्थ्यांना शिकवून विद्यार्थ्यांना गणित विषयाची आवड निर्माण करण्याची किमया केली. विद्यार्थ्यांमध्ये मिळून मिसळून मित्र-मैत्रिणीप्रमाणे राहून विद्यार्थ्यांच्या लाडक्या प्रा. सुकन्या रासकर मॅडम यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. शिस्तबद्ध नियोजन गुणवत्तापूर्ण शिक्षण यामुळेच हे यश संपादन झाले. अकॅडमीचे या यशाबद्दल सातारा जिल्ह्यात माने बंधूंचं  विशेष कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments