काशिलिंग बिरदेव देवस्थान मुर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण उत्साहात संपन्न.
कासेगाव - प्रतिनिधी.
नेर्ले ता. वाळवा येथे काशिलिंग बिरदेव देवस्थान मुर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी परिसरातील भाविकांची मोठी उपस्थिती होती. या सोहळ्यास सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील (दादा) यांनी भेट देऊन दर्शन घेतले यावेळी त्यांचा देवस्थान समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थान समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments