मोकाशी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी पनवेल येथे प्रशिक्षणासाठी रवाना.
कराड - प्रतिनिधी
मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचलित दादासाहेब मोकाशी औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजमाची ही संस्था मागील दहा वर्षापासून औद्योगिक प्रशिक्षण क्षेत्रासाठी गुणवंत विद्यार्थी घडवण्याचे कार्य करत आहे. संस्थेमध्ये विद्युत तंत्रज्ञ यंत्र जोडणीकार, स्थापत्य आराखडा निर्मिती तसेच यांत्रिक आराखडा निर्मिती असे विविध अभ्यासक्रम शिकवले जातात.
नवी दिल्ली येथील महासंचा लनालयाने निश्चित केलेल्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा यासाठी 150 तासांचे कार्यस्थळ प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. त्याअंतर्गत द्वितीय वर्ष विद्युत तंत्रज्ञान विभागातील बारा विद्यार्थ्यांची मुंबई येथील एल अँड टी बांधकाम कौशल्य प्रशिक्षण संस्था पनवेल येथे प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे.
या प्रशिक्षणा दरम्यान विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचे सखोल ज्ञान दिले जाणार असून पुढील रोजगारासाठी ते उपयुक्त ठरणार आहे. या प्रशिक्षणासाठी शेखर रामचंद्र कुंभार, विश्वजीत लक्ष्मण सावंत, समीर नानासो ताटे,श्रवण उमेश रेणुशे, सिद्धेश संजय चव्हाण, सिद्धार्थ राजेंद्र जगताप, रितेश संभाजी जमाले, किरण दत्तात्रय चव्हाण,विश्वजीत हनुमंत सावंत, आदित्य अशोक जाधव, श्रावण दिलीप घोरपडे व प्रशांत राजकुमार राठोड या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.हे प्रशिक्षण पूर्णता विनामूल्य असून विद्यार्थ्यांच्या निवास व भोजनाची सुविधा ही मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली.





Post a Comment
0 Comments