येवती येथील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश खरोखरच प्रेरणादायी :वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप
गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार
कराड - प्रतिनिधी.
कराड येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ग्रामीण शिक्षण संस्थेच्या येवती विद्यालय येवती येथील इयत्ता दहावी मध्ये उत्कृष्ट गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन कराड येथील शासकीय विश्रामग्रह मध्ये करण्यात आले होते, हा कार्यक्रम पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या पुढाकारातून येवती परिसरातील विविध शाळांमधील दहावी परीक्षेत 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार करण्यात आला, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कराड ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप होते तर प्रमुख पाहुणे कराड वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी, मंडल अधिकारी शितल सुतार, तलाठी करुणा मॅडम, पत्रकार संघाच्या सातारा जिल्हाध्यक्ष विद्याताई मोरे, क्रीडा शिक्षक पांडुरंग पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना जगताप साहेब म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी दहावी मध्ये 80% हून अधिक गुण मिळवून मिळवलेले यश खरोखरच कौतुकास्पद आहे, असेच यश आपण यापुढे बारावीत देखील मिळवावे आपल्या आई-वडिलांनी केलेले संस्कार याचे देखील पालन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले सत्कारासाठी खालील शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती.ग्रामीण शिक्षण संस्थेचे येवती विद्यालय, येवतीन्यू इंग्लिश मीडियम स्कूल, उंडाळे.सद्गुरु बाबा महाराज हायस्कूल, सवादे,कोटा अकॅडमी ,कराड मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन करताना कठोर परिश्रम, शिस्त आणि सातत्य यांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करताना त्यांनी पालक व शिक्षकांच्या योगदानाचाही गौरव केला.या प्रेरणादायी उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला असून भविष्यात आणखी मोठी यशे संपादन करण्याची प्रेरणा मिळाली. उपस्थित पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून आयोजकांचे अभिनंदन केले.


Post a Comment
0 Comments