Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

इस्लामपूरमध्ये ढब्बू ट्रेडर्सला भीषण आग मोठे नुकसान.

 इस्लामपूरमध्ये ढब्बू  ट्रेडर्सला भीषण आग मोठे नुकसान.

इस्लामपूर - प्रतिनिधी. (सुनिल शिंदे )

 इस्लामपूर ता. वाळवा शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेत आज दुपारच्या सुमारास राजेंद्र ढब्बू, संतोष ढब्बू यांचे मालकीचे असणाऱ्या ढब्बू ट्रेडर्सला भीषण आग लागली.  आग लागल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, सुरुवातीला दुकानाच्या वरच्या मजल्यातून धूर निघताना दिसला. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले आणि शेजारील दुकानांपर्यंत ज्वाळा पोहोचण्याची भीती निर्माण झाली. आग लागल्यानंतर परिसरात धुराचे लोट पसरले होते.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. नागरिकांच्या मदतीने परिसर रिकामा करण्यात आला.सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही.आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. पोलिस आणि अग्निशमन विभाग या घटनेचा पुढील तपास करत आहेत.स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले असून अशा घटनांपासून बचाव करण्यासाठी सुरक्षेची योग्य काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

Post a Comment

0 Comments