डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न.
कराड -प्रतिनिधी.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती,चिखली (आंबेडकर नगर) ता.कराड, जि.सातारा ,जय मल्हार मित्र मंडळ चिखली , पंचशील महिला मंडळ, चिखली यांच्या वतीने बुध्द मुर्ती प्रतिष्ठापना प्रथम वर्धापन दिन व गुणवंत यशस्वी विद्यार्थी- विद्यार्थीनीचा व सामाजिक राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रातील नेत्रदीपक कार्याबद्दल मोठ्या उत्साहात व आनंदात वातावरणात सत्कार संपन्न.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु.आकाराम गायकवाड हे होते. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित मार्गदर्शक आयु.साहेबराव आनंदा लोखंडे - सर, माजी जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हा व आयु. बाळासाहेब जगताप उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा (पश्चिम) व उपस्थित मान्यवर व बौध्द,बंधु- भगिणी, बालबालिका,उपासक, उपासिका,बहुजन समाजातील बंधु- भगिनी यांची उपस्थिती होती . भगवान बुद्ध व छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज ,क्रांतिकारक जोतिबा फुले,माता सावित्रीमाई, माता रमाई,साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलित करून महामानवास सामुदायिक वंदन व पंचांग प्रणाम करुन त्रीसरण, पंचशील बुद्धपुजा झाली.कार्यक्रमाचे अध्यक्ष
प्रमुख मार्गदर्शक प्रमुख पाहुणे यांचा सत्कार शाल पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. व्याख्याते मा.आयु.साहेबराव लोखंडे.सर यांनी त्रिसरण व पंचशील यांची सखोल व अभ्यास पुर्ण माहिती सांगितली.तद्नंतर मा.जगताप बाळासाहेब यांनी प्रथमच या गावाने अशा पध्दतीने कार्यक्रम घेवून नावलौकिक मिळवला आहे . बुद्धाचे तत्त्वज्ञान अनुसरून आपलं जीवन सुखी केलं पाहिजे असं मार्गदर्शन केलं.तद्नंतर इयत्ता 10 वी,12 वी बी.ए.,बी.कॉम.बी.एस्सी.पदव्युत्तर विभाग एम.बी.बी.एस. व इतर स्पर्धात्मक परिक्षेस उज्ज्वल यश संपादन केले अशा सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनीचा व सामाजिक, राजकीय, औद्योगिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी केलेबद्दल अशा मान्यवराचा कमिटीच्या व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते शाल,पुष्पगुच्छ,पुष्पहार सन्मानपत्र, पेढे,मोठी वही देऊन सत्कार करण्यात आला. तद्नंतर
मा.गायकवाड आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कोणत्याही एका जातीचे नाहीत त्यांनी समस्त मानव जातीच्या उध्दाराचे काम संविधानाच्या माध्यमातून केले आहे.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु.वैभव कांबळे सर यांनी व सूत्रसंचालन आयु.यशपाल कांबळे सर यांनी केले. व उपस्थित मान्यवर प्रमुख पाहुणे व उपस्थित सर्व मंडळीचे आभार आयु.अधिकराव सोनावले यांनी व्यक्त केलेनंतर धम्मपालनगाथा व सरणत्तय घेऊन कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमास भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीचे पदाधिकारी,व सदस्य उपस्थित होते.जय मल्हार मंडळाचे सर्व पदाधिकारीव कार्यकर्ते तसेच पंचशील महिला मंडळातील सर्व महिला पदाधिकारी,व सर्व महिला मंडळातील महिला तसेच चिखली येथील बौद्ध व बहुजन समाजातील बंधु- भगिनी,उपासक- उपासिका,बाल-बालिका विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून सहकार्य केले व कार्यक्रमाची शोभा वाढवून आनंद व्दिगुणीत करण्यामध्ये भाग घेतला.





Post a Comment
0 Comments