वारणा प्रसाद विद्यालयात NCC व क्रीडा शिक्षकांची सहविचार सभा संपन्न.
शिराळा :- प्रतिनिधी.
वारणा प्रसाद विद्यालय बिळाशी (ता. शिराळा )मध्ये NCC व क्रीडा शिक्षकांची सहविचार सभा संपन्न झाली. एन.सी.सी व क्रीडा विभागाचे संस्था मार्गदर्शक मा.श्री लवटे सर यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 1:00 ते 4:30 पर्यंत मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये वर्षभरातील एन.सी.सी व क्रीडा विभागाच्या महत्त्वाच्या बाबी बद्दल सखोल चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.तसेच यामध्ये काही चांगल्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला, तसेच अडचणी वरती सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले. पुढील वर्षांमध्ये या सहविचार सभेमध्ये ठरलेल्या नियोजनाप्रमाणे कामकाज करण्याबाबत चर्चा झाली. या विभागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता व कौशल्य विकासासाठी सर्वच संस्थेच्या शाळेतील शिक्षक प्रयत्नशील असतील याप्रमाणे नियोजन करण्यात आले.शाळेचा व संस्थेचे नावलौकिक जास्तीत जास्त व्हावे यासाठी पुढील शैक्षणिक वर्षात आपल्या विभागाकडून जास्तीत जास्त नियमबद्ध व कटिबद्ध कामकाज होईल असेच सर्व शिक्षकांच्या चर्चेतून ठरवण्यात आले. मार्गदर्शक मा.श्री लवटे सर यांच्याकडून अतिशय उत्कृष्ट व चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन झाले व संस्थेच्या नियोजनाप्रमाणे सभा नियोजनपूर्वक संपन्न झाली .


Post a Comment
0 Comments