शामराव पाटील पतसंस्थेचे 201 कोटी रु.ठेवीचा टप्पा पूर्ण.
उंडाळे - प्रतिनिधी.
उंडाळे ता. कराड येथील लोकनेते विलासराव पाटील उंडाळकर यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या आणि ॲड.उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या दिवंगत स्वातंत्र्यसैनिक शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेने 31 मार्च 2026 अखेर 201 कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पूर्ण करून उल्लेखनीय कामगिरी केली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शहाजी शेवाळे यांनी दिली.
शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना झाली. स्थापनेपासून संस्थेने सातारा सांगली पुणे व ठाणे या जिल्ह्यात आपले जाळे विस्तारले असून सध्या संस्थेच्या एकूण 29 शाखा कार्यरत आहेत स्थापनेपासून संस्थेला सातत्याने 'अ 'वर्गाचा ऑडिट दर्जा मिळत आहे. संस्थेच्या सर्व शाखांमध्ये आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध असून, लाईट बिल स्वीकृतीची सोय तसेच सोनेतारण कर्ज सुविधाही उपलब्ध आहेत. चालू आर्थिक वर्षात संस्थेने उल्लेखनीय प्रगती साधली आहे. आर्थिक वर्ष सन 2025 26 या आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवी 201 कोटी पर्यंत पोहोचल्या. संस्थेने 179 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले असून वसूल भाग भांडवल 11 कोटी 66 लाख रुपये आहे,संस्थेस 1 कोटी 43 लाख रुपयेचा नफा झालेला आहे. शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी वरदान ठरत असल्याची भूमिका ग्रामीण भागात रुजत आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री. शहाजी शेवाळे यांनी माध्यम प्रतिनिधींना दिली.


Post a Comment
0 Comments