कु. आराध्या जाधव हिचे टॅलेंट सर्च परीक्षेत उज्वल यश.
शिराळा - प्रतिनिधी.
समाज विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सागाव ( ता. शिराळा ) इयत्ता आठवी मध्ये शिकणारी कु. आराध्या संपत जाधव हिने डॉ. होमी भाभा टॅलेंट सर्च परीक्षा २०२६ मध्ये द्वितीय क्रमांक पटकावत उज्ज्वल यश संपादन केले आहे. डॉ.होमी भाभा टॅलेंट सर्च परीक्षा 2026 या परीक्षेमध्ये एकूण 2000 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. या द्वितीय क्रमांकासाठी तिला ₹३१,०००/- रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह मिळाले . तिच्या अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीमुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. विद्यालयाच्या वतीने तसेच समाजातून विविध स्तरातून कु. आराध्या संपत जाधव हिचे कौतुक, अभिनंदन केलं जातंय तसंच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.


Post a Comment
0 Comments