Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

हायर पॅटर्न शिराळा MHT-CET क्रॅश कोर्सचा सदिच्छा समारंभ उत्साहात.

 हायर पॅटर्न शिराळा MHT-CET क्रॅश कोर्सचा सदिच्छा समारंभ उत्साहात.

शिराळा - प्रतिनिधी.

सागाव( ता. शिराळा )येथील समाज विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 2025-26 या बॅचसाठी आयोजित हायर पॅटर्न शिराळा MHT-CET क्रॅश कोर्सचा सदिच्छा समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य श्री. आर. पी. पाटील सर यांनी भूषविले. CET विभाग प्रमुख डॉ. एस. एस. गोसावी सर यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात केली.यावेळी मुख्याध्यापक पाटील सर व उपमुख्याध्यापक श्री. पी. बी. मोहिरे सर यांनी विद्यार्थ्यांना MHT-CET परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पी. एम. जाधव मॅडम यांनी केले. या प्रसंगी मुख्याध्यापक पाटील सर, उपमुख्याध्यापक मोहिरे सर, पर्यवेक्षक श्री. कुलकर्णी सर, जाधव सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments