Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या फुले दाम्पत्यास भारतरत्न मिळाला पाहिजे !

 शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या  फुले दाम्पत्यास भारतरत्न मिळाला पाहिजे !

सातारा : म.फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना अनिल वीर,डॉ.राजेंद्र माने,नंदकुमार सावंत व मान्यवर.

सातारा - प्रतिनिधी.

 क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्यानी प्रतिकूल परिस्थिती ज्ञानाची कवाडे खुली केली.खरोखरच, शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या दाम्पत्यास मरणोत्तर भारतरत्न मिळावा.असा पुनरुच्चार ज्योती-सावित्री पुरस्कार विजेते अनिल वीर यांनी केला.

     येथील नगरवाचनालयात क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची १९९ वी जयंती साजरी करण्यात आली.तेव्हा वीर बोलत होते.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.राजेंद्र माने होते.यावेळी मसापचे अध्यक्ष नंदकुमार सावंत,सतीश आष्टीकर,प्रकाश खटावकर, धीरज देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

     "क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले हे १९ व्या शतकातील महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक, विचारवंत आणि क्रांतिकारी कार्यकर्ते होते. स्त्री शिक्षण,अस्पृश्यता निवारण आणि शेतकरी-बहुजनांच्या हक्कासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला होता.२४ सप्टेंबर १८७३ रोजी त्यांनी दलितांना आणि बहुजन समाजाला सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी सत्यशोधक समाज ही संस्था स्थापन केली. याशिवाय ते स्त्री शिक्षणाचे प्रणेते ठरले. १८४८ मध्ये पुण्यातील भिडेवाड्यात त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली, ज्यामध्ये सावित्रीबाई फुले यांनी शिक्षिकेची भूमिका बजावली.समाजासाठी केलेल्या अतुलनीय कार्यामुळे मुंबईतील एका सभेत १८८८ मध्ये त्यांना 'महात्मा' ही पदवी प्रदान करण्यात आली.कृषी व शैक्षणिक सुधारणा त्यांनी केलेल्या आढळून येत आहेत. शेतकऱ्यांच्या दुःस्थितीवर त्यांनी 'शेतकऱ्याचा असूड' या ग्रंथातून प्रकाश टाकला. तसेच सक्तीचे प्राथमिक शिक्षण आणि पुनर्विवाहास त्यांनी प्रोत्साहन दिले.'गुलामगिरी', 'शेतकऱ्याचा असूड', 'सार्वजनिक सत्यधर्म', 'तृतीय रत्न' (नाटक) हे त्यांचे प्रमुख साहित्य आहे.त्यांचा जन्म पुण्यात झाला असला तरी त्यांचे मूळ कुटुंब सातारा जिल्ह्यातील कटगुण येथील होते.ज्योतिराव फुले यांनी मानवी समतेवर आधारित समाजाची निर्मिती करण्यासाठी जातीभेद आणि अंधश्रद्धेविरुद्ध मोठा संघर्ष केला होता."

    प्रथमतः म.फुले यांच्या प्रतिमेस अनिल वीर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला तर उपस्थितांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.विष्णु धावडे यांनी स्वागत केले. भाग्यश्री शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.सारिका मनहास यांनी आभार मानले.यावेळी पदाधिकारी,कर्मचारी व वाचक उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments