Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

अवैध सावकारी पिळवणूकीच्या त्रासाच्या अनुषंगाने पिडीतांनी संपर्क साधण्याचे आवाहन.

 अवैध सावकारी पिळवणूकीच्या त्रासाच्या अनुषंगाने पिडीतांनी संपर्क साधण्याचे आवाहन.

ब्युरो रिपोर्ट (ज्ञानेश्वर शेवाळे.)

सातारा जिल्हयात विना परवाना अवैध सावकारी व्यवसाय करीत असल्याबाबत निवेदने प्राप्त होत आहेत. त्याअनुषंगाने सातारा जिल्हयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, जर एखादी व्यक्ती विना परवाना अवैधरित्या सावकारी व्यवसाय करित असेल व सदर अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तिकडुन एखाद्या नागरिकाची पिळवणुक होत असेल तर अशा पिडीत नागरिकांनी याबाबत संबंधित तालुक्यातील सहकारी संस्थांचे सहायक निबंधक यांच्याकडे आवश्यक त्या कागदपत्रे व पुराव्यानिशी गोपनीय तक्रार करण्याचे आवाहन सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सूद्रीक यांनी केले आहे.पिडीतांच्या तक्रारी अर्जानुसार महाराष्ट्र सावकारी अधिनियम, २०१४ या नियमान्वये कारवाई करण्यात येणार असून अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींकडुन पीडीत व्यक्तीस जीवे मारण्याची धमकी, मारहाण दमदाटी, शिवीगाळ अशा स्वरुपात मानसिक व शारिरीक त्रास होत असल्यास संबंधित पिडीतांनी याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचे आवाहनही संजयकुमार सुद्रिक जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था सातारा यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments