Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

स्मिता पोरे यांना पीएच.डी. प्रदान.

 सागरी व नदीतील शेवाळापासून इथेनॉल निर्मितीवर संशोधन ___स्मिता पोरे यांना पीएच.डी. प्रदान.

सोलापूर : प्रतिनिधी.

पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत सौ. स्मिता महेश पोरे यांनी “मॅक्रो आणि मायक्रो अल्गीपासून बायोडिझेल (इथेनॉल) निर्मिती” या विषयावर यशस्वीरीत्या पीएच.डी. प्रबंध सादर करून पदवी प्राप्त केली. पर्यावरण विज्ञान विषयातील हे संशोधन शाश्वत ऊर्जा निर्मितीसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे मानले जात आहे. या संशोधनासाठी प्रा. डॉ. विनायक धुळप यांचे मार्गदर्शन लाभले.

या संशोधनामध्ये अल्गीपासून जैवइंधन निर्मिती, फोटोबायोरिअक्टरची उभारणी, इथेनॉल उत्पादन तसेच उरलेल्या जैवमासाचे जैवखतामध्ये रूपांतर यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश आहे. त्यांच्या या कार्यामुळे पर्यावरणपूरक व किफायतशीर ऊर्जा उपायांना चालना मिळणार आहे.

त्यांच्या पीएच.डी. संशोधनातून ७ संशोधन निबंध प्रकाशित झाले असून २ भारतीय युटिलिटी पेटंट, १ यूके पेटंट व १ जर्मनी पेटंट त्यांनी प्राप्त केले आहेत. तसेच ‘अन्वेषण’ व राज्यस्तरीय ‘आविष्कार’ यांसारखे मानाचे पुरस्कारही त्यांनी मिळवले असून विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी संशोधन सादर केले आहे.

 शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे आयोजित ‘इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह 2.0’ मध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच त्यांच्या संशोधनाच्या व्यावसायिक अंमलबजावणीसाठी स्टार्टअप रिसर्च प्रकल्पाची संधीही त्यांना प्राप्त झाली आहे, जे त्यांच्या कार्याचे मोठे यश मानले जात आहे.

मौखिक Viva-Voce समितीचे अध्यक्ष डॉ. प्रशांत एम. पवार (अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान) होते, तर बाह्य परीक्षक म्हणून डॉ. प्रकाश करियाजनवार (गुलबर्गा विद्यापीठ) आणि मार्गदर्शक डॉ. विनायक धुळप यांनी काम पाहिले.

प्रा.आर.आर.पाटील, प्रा.अनिल नारायणपेठकर, डॉ.धवल कुलकर्णी, डॉ.प्रियंका माने (धुळप) संकुलातील आणि विद्यापीठातील विविध विभागातील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. स्मिता पोरे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील शैक्षणिक व संशोधन प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Post a Comment

0 Comments