Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

सह्याद्री एक्सप्रेसवर मध्यरात्री दरोडा सिग्नल मध्ये बिघाड करून प्रवाशांची लूट.

 

सह्याद्री एक्सप्रेसवर मध्यरात्री दरोडा सिग्नल मध्ये बिघाड करून प्रवाशांची लूट.
 

कराड - प्रतिनिधी.

कराड तालुक्यातील शेणोली स्टेशन परिसरात रेल्वेच्या सिग्नल मध्ये बिघाड करून सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा टाकण्यात आल्याची मोठी घटना घडली कराड तालुक्यातील शेनोली स्टेशन परिसरातील घटनेने एकच खळबळ उडाली आहे या गंभीर घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूरहून पुण्याला निघालेल्या सह्याद्री एक्सप्रेस वर कराड तालुक्यातील शेनोली स्टेशन जवळ मध्यरात्री दरोडा टाकण्यात आला, सातारा व सांगली जिल्हा हद्दीपासून काही अंतरावर मध्यरात्री ही घटना घडली संशयितांनी सिग्नलशी छेडछाड करत सिग्नल बंद पाडला होता त्यामुळे हा सिग्नल बंद असल्याने रेल्वे अचानक थांबली ही रेल्वे थांबल्याचे पाहताच संशयतांनी डब्यामध्ये प्रवेश करून प्रवाशांचे सोने व मोबाईल लंपास केले या घटनेची माहिती मिळताच तात्काळ मिरज लोहमार्ग रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून अधिक तपास सुरू आहे.





Post a Comment

0 Comments