Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

आमदार अतुलबाबा भोसले यांचा जिंती – खोचरेवाडी येथील शेतकऱ्यांना दिलासा.

 आमदार  अतुलबाबा भोसले यांचा जिंती – खोचरेवाडी येथील शेतकऱ्यांना दिलासा.

उंडाळे :- प्रतिनिधी.

जिंती खोचरेवाडी येथील शेतकरी शहाजी खोचरे , संभाजी खोचरे,सतीश खोचरे, सुधीर खोचरे, दादा खोचरे यांच्या शेतातून जाणारा महारुगडेवाडी जिंती चव्हाण मळा रस्ता खडीकरणाचे व डांबरीकरणाचे 50 लाख निधीचे काम आमदार अतुलबाबा यांचे फंडातुन चालु आहे.मात्र, हा रस्ता थेट शेतातून जात असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. त्यामुळे खोचरेवाडी येथील शेतकरी कुटुंबाने कराड येथील विश्रामगृहात आयोजित जनता दरबार मध्ये मा. आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांची भेट घेतली.यावेळी प्रविण साळुंखे (मंडल अध्यक्ष), संतोष पाटील (पोलीस पाटील), स्वाती खोचरे अशोक खोचरे  यांनी आमदार अतुलबाबा यांचेकडे शेतकऱ्यांची बाजू ठामपणे मांडली. शेतकऱ्यांनी “आमची शेती वाचवा, रस्ता आमच्या हद्दीतून बाजूने काढा” अशी विनंती केली.शेतकऱ्यांची अडचण समजून घेत आमदार अतुल बाबा भोसले यांनी तात्काळ दखल घेत जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी श्री.भजनावळे रावसाहेब यांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले.पाहणीनंतर शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे स्पष्ट झाल्याने  रस्ता शेताच्या बाजूने वळवण्याचा निर्णय तातडीने घेण्यात आला.सध्या रस्त्याचे काम नवीन मार्गाने सुरू असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिंती येथील शेतकरी खोचरे कुटुंबीयांनी आमदार अतुलबाबा भोसले यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.यावेळी अशोक खोचरे ,स्वाती खोचरे, सतीश खोचरे, विकास खोचरे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments