मंत्री शंभूराज देसाई यांच्या जनता दरबारास लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
पाटण :- प्रतिनिधी.
दौलतनगर ता. पाटण येथे मंत्री शंभूराज देसाई यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या समस्या, मागण्या व सूचना मांडल्या. नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या .पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, वीज समस्या, महसूल विषयक अडचणी, शासकीय योजनांचा लाभ, पेन्शन प्रकरणे तसेच इतर स्थानिक प्रश्नांबाबत नागरिकांनी मांडलेल्या निवेदनांवर संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. काही प्रकरणांमध्ये अधिकाऱ्यांशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधत कामे लवकर पूर्ण करण्याबाबतही निर्देश दिले.यावेळी पाटण विधानसभा मतदारसंघातील शासकीय सेवेत नव्याने रुजू झालेल्या तरुणांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. समाजातील तरुणांनी प्रामाणिकपणे सेवा करत राज्याच्या विकासात योगदान द्यावे, ही अपेक्षा व्यक्त केली.जनतेच्या समस्या शासनापर्यंत पोहोचून त्यांचे त्वरित निराकरण व्हावे, यासाठी शासन कटिबद्ध आहे. “जनता दरबार” हा उपक्रम लोकाभिमुख प्रशासनाचे उत्तम उदाहरण ठरत असून नागरिकांना थेट संवादाचे प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देतो असं मत मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलं.






Post a Comment
0 Comments