Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न.

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या  उत्साहात संपन्न.

काले - प्रतिनिधी.

ओंड,ता.कराड ( संघर्ष भूमी- ओंड) येथील भारतरत्न,डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकओंड येथील भीमशक्ती तरुण मित्र मंडळ, ओंड व फ्रेन्ड्स सर्कल ग्रुप,ओंड रमाई महिला मंडळ, ओंड  व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक सेवा संघ,ओंड  यांच्या वतीने  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव व ओंड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सभेचा 88 वा वर्धापनदिन  मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु.संजय गणपत लादे व या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित मार्गदर्शक पाहुणे पंचायत समिती कराड सदस्या सौ.स्वाती मानसिंगराव थोरात,ओंड गावच्या पोलीस पाटील सौ.वंदना माळी , ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष व पत्रकार मा.आनंदा थोरात,महाराष्ट्र शासन दलित मित्र पुरस्कार प्राप्त आयु.भगवानराव जाधव, पारेशन विभागाचे साहेब व भारतीय बौद्ध महासभा जि.सातारा माजी जिल्हाध्यक्ष मा.आयु.सुदाम ढापरे साहेब,ओंड या गावचे कोतवाल मा.सुरेश आडके, माजी जिल्हाध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा जि.सांगली, मा.आयु.साहेबराव आनंदा लोखंडे.केंद्रिय शिक्षक. माजी मुख्याध्यापक व मा.अध्यक्ष भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक सेवा संघ ,ओंड व वंचित बहुजन आघाडीचे सातारा जि.उपाध्यक्ष मा.बाबासाहेब जगताप साहेब. व भारतीय बौद्ध महासभा जि.सातारा ( पुर्व विभाग) संघटक,आयु. सुधाकर शिलवंत - वडूज,उपस्थित मान्यवर व बौध्द,बंधु- भगिणी, बालबालिका,उपासक, उपासिका,बहुजन समाजातील बंधु- भगिनी यांच्या उपस्थितीत. जगतगुरु,जगतवंदनीय महाकारुणिक भगवान बुद्ध व विश्वभूषण बोधिसत्व प्रकांडपंडीत, संविधान निर्माते, समस्त मानव जातीचे उध्दारक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून  मेणबत्ती,आगरबत्ती प्रज्वलित करून महामानवास सामुदायिक वंदन व पंचांग प्रणाम करुन त्रीसरण, पंचशील, बुद्धपुजा, भीमस्मरण भीमस्तुती व विधायक पंचशील घेऊन सुरुवात करण्यात आली.उपस्थित प्रमुख मार्गदर्शक  प्रमुख पाहुणे यांचा सत्कार,शाल पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. 

 व्याख्याते मा.आनंदा थोरात हे आपल्या भाषणात म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कोणत्याही एका जातीचे नाहीत त्यांनी समस्त मानव जातीच्या उध्दाराचे काम संविधानाच्या माध्यमातून केले आहे .संविधानामुळेच महिलांना पुरुषाच्या बरोबरीने सर्व हक्क व अधिकार मिळाले आहेत. काही मंडळी संविधान बदलण्याची भाषा बोलतात.अधूनमधून केव्हा-केव्हा तरी मानसिक विकृती असणारे मनुवादी बोलत असतात.त्यांना वेळीच रोखने हे  समस्त ब्राम्हणेतर बहुजन समाजाचे काम आहे.पुढील वर्षांपासून हा कार्यक्रम घेऊ या. अशी मांडणी आपल्या व्याख्यानातून मा.आनंदा थोरात यांनी केली.

यानंतर मा.सौ.ज्योती थोरात व माळी  मॅडम यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी माहिती सांगून उपस्थित सर्व मंडळींना शुभेच्छा व्यक्त करुन येथून पुढे आपणास जे काही सहकार्य लागेल ते करण्यात येईल.आपण मदत करु. सर्वजण मिळून मिसळून हा कार्यक्रम साजरा करण्याचा प्रयत्न भविष्यात करुया असे मनोगत व्यक्त केले आहे.

त्यानंतर दलितमित्र मा.भगवानराव जाधव नागराळे (सांगली) यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या येथील भेटीविषयक माहिती सांगून ज्या पध्दतीने अंकलखोप ता.पलूस जि.सांगली या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्यदिव्य असे स्मारक शासनाच्या वतीने उभे करण्यात आले आहे.त्याचा पाठपुरावा मी स्वतःच केला. त्याच पध्दतीने ओंड  येथील स्मारक उभे करणेसाठी पाठपुरावा करुन हे काम मार्गी लावणार आहे.फक्त आपले सहकार्य अपेक्षित आहे. आणि ते आपण सर्वजण मिळून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करीत आहे.

त्यानंतर कु.श्रावणी किशोर जाधव व कु.स्वरा दिलीप कुंभार या.इ.4थी च्या मुली - वनश्री नगर प्राथमिक शाळा,ओंड, ता.कराड, जि.सातारा यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर व कार्यावर अतिशय उत्कृष्ट असे मनोगतपर भाषणे केली.उपस्थित मान्यवर मा.साहेबराव लोखंडे.सर केंद्रिय शिक्षक यांनी दोन्ही मुलीस 

"माता रमाई" लिखीत- डॉ.यशवंत मनोहर ही कादंबरी भेट देऊन मुलींचे कौतुक केले.व पुढील वाटचालीस, शैक्षणिक कार्यास मंगलमय हार्दिक शुभेच्छा दिल्या. जयंती मंडळाच्या वतीने धम्मदानही दोघींना देण्यात आले.आयु.मा.राजेंद्र गणपत लादे मा.मुख्याध्यापक-भोजनदान दाते यांनी जयंतीनिमित्त शुभेच्या  दिल्या

त्यानंतर अध्यक्षीय मनोगत मा.संजय गणपत लादे यांनी केले

आभार-आयु.कैलास कांबळे बौध्दाचार्य, ओंड यांनी उपस्थित मान्यवर मार्गदर्शक प्रमुख पाहुणे व उपस्थित समुदाय यांचे आभार व्यक्त केले.यानंतर धम्मपालनगाथा व सरणत्तय घेऊन कार्यक्रम पहिल्या सत्रातील संपन्न झाला.या कार्यक्रमास भीमशक्ती तरुण मित्र मंडळ,ओंड, फ्रेन्ड्स सर्कल ग्रुप, ओंड, रमाई महिला बचत गट,ओंड भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक सेवा संघ, ओंड,  बौद्ध व बहुजन  समाजातील बंधु- भगिनी,उपासक- उपासिका,बाल-बालिका विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक  अर्थिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.

नंतर उपस्थित सर्वजण यांना मा.आयु.राजेंद्र गणपत लादे माजी मुख्याध्यापक,यांच्या वतीनेउपस्थित उपासक-उपासिका,बाल-बालिका,बंधु-भगिणी बौध्द-बहुजन बंधु-माता भगिनी यांना शुग्रास असे भोजनदान देऊन कुशल कर्म केले.

कार्यक्रमाच्या दुस-या सत्रामध्ये स्मित इंग्लिश मीडियम स्कूल, ओंडोशी येथील विद्यार्थी- विद्यार्थीनी क्रांतिकारक ,समाजसुधारक माता व महामानव यांच्या वेशभूषा मध्ये येवून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक ओंड येथे समोरील  पटांगणात सदर शाळेच्या विद्यार्थी- विद्यार्थींनी  मराठी,संस्कृत, हिंदी, इंग्रजी या भाषेतून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर भाषणे केली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील पोवाडा, व गाणी गाऊन उपस्थित सर्व जनतेची मने जिंकून घेतली.  सर्व कार्यक्रम झालेनंतर स्मित इंग्लिश मीडियम स्कूल, ओंडोशी च्या शाळेच्या मॅनेजमेंट चे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका,नाॅनटिचींग स्टाफ.विद्यार्थी- विद्यार्थींनी व  उपस्थित होते. यावेळी स्मित किरण शैक्षणिक संकुलाच्या सर्व पदाधिकारी शिक्षक यांचे आभार आयु.साहेबराव लोखंडे.केंद्रिय शिक्षक यांनी मानले.सदर शाळेतील या कार्यक्रमात भाग घेतलेल्या व उपस्थित शाळेच्या सर्वच विद्यार्थी-विद्यार्थीना भीमशक्ती तरुण मित्र मंडळ,ओंड व फ्रेन्ड्स सर्कल ग्रुप, ओंड यांच्या वतीने प्रत्येकी वही पेन- पेन्सिल देऊन कौतुक करण्यात आले.व कार्यक्रमाची सांगता झाली.



 कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रात विश्वभूषण बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची ओंड गावातून वाजत-गाजत  जय भीम च्या महामानवाच्या घोषणांच्या निनादात भव्यदिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली .मराठा व बहुजन माता-भगिनी यांनी मिरवणूकीचे ठिक- ठिकाणी स्वागत करुन महामानवास वंदन करुन आनंद व्यक्त करीत होत्या .मिरवणूक अत्यंत शांततेत पार पडली या कामी कराड ग्रामीण पोलीस विभागाचे पोलीस कर्मचारी उपस्थित राहून आपले कर्तव्य चोख पार पाडले.त्यांचेही मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.रात्री 10.00 वा .कार्यक्रमाची सांगता झाली.दि.21/04/2026 रोजी विहापूर (मेंडोशी)येथील मंडळीनी भीमगीतांचा व चळवळींच्या गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. रात्री ठीक 9 ते 11.30 या वेळेतअशा प्रकारे विविध कार्यक्रम घेण्यात आले. या अशा विविध सामाजिक उपक्रमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या जयंती उत्सवासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लोकांनी  सहकार्य केले या सर्वाचे आभार आयोजकांनी मानले.





Post a Comment

0 Comments