कराड तालुका पोलिसांकडून चार आरोपींसह चोरीचा मुद्देमाल जप्त.
कराड - प्रतिनिधी.
चचेगाव ता. कराड येथे एका कंपनीत झालेल्या चोरी प्रकरणी कराड तालुका पोलिसांनी आठ तासात तपास करत आगाशिवनगर मलकापूर परिसरातील चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून लाखो रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड तालुका पोलीस ठाणे हद्दीत चचेगाव ता. कराड गावचे हद्दीत पवार इंजिनियरिंग नावाचे हार्डवेअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी शेजारी असलेल्या बंदिस्त गोडावुन मधून दि 1 एप्रिल 2026 रोजी ते दि. 10 एप्रिल 2026 रोजी दरम्यान एकूण 4 लाख 90 हजार रुपये किमतीचे हार्डवेअर उत्पादनाचा मुद्देमाल (92 बँगा) असा अज्ञात चोरट्याने चोरल्या बाबत कराड तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. 211/2026 भारतीय न्याय संहिता कायदा 2023 चे कलम 305,331,317 (2), 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्हयाचा तपास पोउपनि श्री. सतीश जाधव यांचेकडे देण्यात आलेला होता.सदरचा प्रकार हा गंभीर व आर्थिक प्रकारचा असल्याने वरिष्ठांच्या सुचनेप्रमाणे महेंद्र जगताप, पोलीस निरीक्षक, कराड तालुका, पोलीस ठाणे यांनी कोळे दुरक्षेत्राचे पोउपनि सतीश जाधव, सचिन भिलारी, पोलीस हवालदार गणेश वेदपाठक, जयसिंग राजगे यांचे पथक तयार करून गुन्हा उघडकीस आणणे कामी आदेश दिलेले होते. त्यानुसार नमुद पथकाने तपास कौशल्याचा वापर करून तांत्रिक विश्लेषणाचे आधारावर नमुद गुन्हयात एकुण 4 आरोपी यांना अटक करून त्यांचेकडून चोरीतील एकूण 3 लाख 37 हजार रुपयाचा हार्डवेअर उत्पादनाचा मुद्देमाल जप्त करुन सदरचा गुन्हा 8 तासात कौशल्याने तपास करून उघडकीस आणलेला आहे.नमुदचा गुन्हा उघडकीस आणणेकामी पोलीस निरीक्षक, महेंद्र जगताप, पोउपनि सतीश जाधव, सचिन भिलारी, पोलीस हवालदार गणेश वेदपाठक, जयसिंग राजगे, सचिन निकम, नाना नारनवर यांनी सहभाग घेतला होता. त्यांचे कामगीरीबाबत पोलीस अधीक्षक सो सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.


Post a Comment
0 Comments