रविराज पोपटराव लोंढे यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
कराड - प्रतिनिधी.
खोडशी ता. कराड गावचे सुपुत्र रविराज पोपटराव लोंढे. यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.भारतश्री कार्य गौरव सोहळा पुणे यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पुरस्कारामध्ये सातारा जिल्यातून दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निर्माते अभिनेते पार्श्वगायक रविराज लोंढे यांची निवड करण्यात आली आहे. चित्रपट सृष्टीमध्ये नाव लौकिक असलेले. निर्माते अभिनेते पार्श्वगायक रविराज लोंढे यांनी अनेक चित्रपट अल्बम वेब सिरिज निर्मित केली आहेत. त्यांनी गायलेलं गाणं धगाड ताकाडं वाजतय हे अल्बम सॉंग सरगम मराठी म्युसिक या चॅनेल वरती महाराष्ट्र भर वाजतंय. तसेच धनश्री फिल्म प्रोडक्शन सहस्त्र दर्शनम ही हिंदी वेब सिरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तसेच हा पुरस्कार मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले व अनेक मान्यवरांचे हस्ते देण्यात येणार आहे.


Post a Comment
0 Comments