Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी.

 येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने  शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी.

 कराड - प्रतिनिधी.

येवती ता. कराड येथे शिवतेज सामाजिक विकास संस्थेच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, सकाळी 10.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस गावातील मान्यवरांच्या हस्ते  पुष्पहार घालण्यात आला, त्यानंतर सकाळी 11 वाजता रोटरी क्लब मलकापूर संस्कार आय हॉस्पिटल कराड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी शिबिराचा उद्घाटन समारंभ पार पडला.या शिबिराचे उद्घाटन पारायण मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक रामचंद्र शेवाळे, प्रा. आत्माराम शेवाळे , रोटरी क्लब मलकापूर चे अध्यक्ष राहुल जामदार, सचिव विजय दुर्गवळे, सरपंच हिराबाई गुरव, संस्थेचे उपाध्यक्ष अनिल शेवाळे ,सचिव ज्ञानेश्वर शेवाळे  यांच्या हस्ते पार पडले, या शिबिराचा 40 ग्रामस्थांनी  लाभ घेतला त्यानंतर सायंकाळी सहा वाजता येवती गावातील 35 हिरकणींचा भैरवनाथ लेझीम पथकाचा कार्यक्रम संपन्न झाला हा कार्यक्रम कराड ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी ते बोलताना म्हणाले की आपल्या गावातील मुलींनी लेझीम पथकाचा कार्यक्रम हा उत्कृष्ट सादर केला . अशीच प्रगती यापुढे देखील आपण करत राहावी ,शिवतेज संस्थेने देखील राबवलेले उपक्रम खरोखरच आदर्शवत असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले , वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे स्वागत उपाध्यक्ष अनिल शेवाळे यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर शेवाळे यांनी मानले.



Post a Comment

0 Comments